उस्मानाबाद- 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार; अंतिम दर्शनासाठीची नातेवाईकांची धडपड

मुंबई तक

• 04:12 AM • 17 Apr 2021

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रकोप पहायला मिळतोय. वाढत्या रूग्णसंख्येने मृत्यू दरातही प्रचंड वाढ झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू पावलेल्या २३ जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आलं. अंतिम दर्शनासाठी कुणी स्मशानभूमीच्या कम्पाउंडवर तर कुणी उंच डोंगरावर उभं राहून मयताचे अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांचा हा प्रयत्न मनाला […]

Mumbaitak
follow google news

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रकोप पहायला मिळतोय. वाढत्या रूग्णसंख्येने मृत्यू दरातही प्रचंड वाढ झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात देखील परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू पावलेल्या २३ जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आलं. अंतिम दर्शनासाठी कुणी स्मशानभूमीच्या कम्पाउंडवर तर कुणी उंच डोंगरावर उभं राहून मयताचे अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांचा हा प्रयत्न मनाला चटका लावणारा होता.

हे वाचलं का?

एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अंतिम संस्कार करण्याची ही उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरी वेळ आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा अपुरी पडताना दिसतेय. यापूर्वी 14 एप्रिलला 19 कोरोनाबाधित मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाने 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांच्या सॅम्पलमध्ये आढळलं डबल म्युटेशन – राजेश टोपे

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढतेय. जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 580 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबाद तालुक्यात 300, तुळजापूर 39, उमरगा 68, लोहारा 26, कळंब 58, वाशी 36, भूम 20 आणि परंडा या ठिकाणी 33 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या महिन्याभरातील कोरोना रुग्णांची संख्या पाहिली तर मार्च महिन्यापासून रूग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसतोय. 24 मार्चला ही आकडेवारी 176 वर होती. परंतु सध्याच्या घडीला ही आकडेवारी थेट 580 वर पोहोचली आहे.

    follow whatsapp