एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचं काय होणार? हा प्रश्न आता समोर आला आहे. अशात शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोन भाषणं केली त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
ADVERTISEMENT
उल्हासनगर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं ऑफिस फोडण्यात आलं. तर तानाजी सावंत यांचंही कार्यालय फोडण्यात आलं. अशात उस्मानाबादमध्येही तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणा बाजी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी उस्मानाबाद या ठिकाणी संपर्क कार्यालयासमोर शिवसैनिकांनी हल्लाबोल करत आंदोलन केलं. त्यांच्या कार्यालयाला काळं फासलं.
तानाजी सावंत यांना गद्दार असं संबोधत खेकडा सावंत असा बोर्डही लिहिण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यात रोष वाढलेला दिसून आला. तानाजी सावंत यांचा मतदार संघ असलेल्या परंडा या ठिकाणी शिवसैनिकांनी जोराद आंदोलन करण्यात आलं. चपलेले जोडेही मारण्यात आले. तसंच घोषणाबाजी करण्यात आली. उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत यांच्या विरोधात एक गट तसंच त्यांच्या समर्थकांचाही गट आहे. आज सावंत यांच्या विरोधात आंदोलन होत असताना समर्थकांकडून तसंच उत्तर देण्यात आलं आहे.
उस्मानाबाद या ठिकाणी शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसैनिकांनी आमदार सावंत संपर्क कार्यालयावर हल्लाबोल करत काळं फासण्यात आलं. शिवसैनिकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं आहे. सावंत यांचा विरोध करणाऱ्यांनी खेकडा सावंत असं लिहिलं होतं ते त्यांच्या समर्थकांनी खोडून काढलं.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंड पुकारलं आहे. त्यांच्यासोबत ३६ पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार आहेत. तसंच अपक्ष आमदार धरून साधारण ४५+ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. आसाममध्ये या सगळ्यांना ठेवण्यात आलं आहे. ही बंडखोरी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी बंडखोरी मानली जाते आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. रोज नवे ट्विस्ट आणि टर्न्स समोर येत आहेत. हे सगळं राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी यांनी जे बंड राज्यात पुकारलं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशात आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वडोदरा या ठिकाणी भेट झाली आहे असं कळतं आहे. मुंबई तकच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती समोर आली आहे.
पहाटे अडीच ते चार या वेळेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची भेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच हा संदर्भ समोर येतो आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईहून वडोदऱ्याला गेले होते. तसंच एकनाथ शिंदे हे आधी दिल्लीला गेले त्यानंतर दिल्लीहून वडोदऱ्याला गेले होते. आधी गुवाहाटीहून दिल्लीत एकनाथ शिंदे गेले होते आणि मग ते वडोदऱ्याला गेले होते अशी माहिती मिळते आहे.
ADVERTISEMENT