कोकण विभागासाठी आमदार रोहित पवार यांनी दिले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

मुंबई तक

• 10:52 AM • 17 May 2021

राज्यात कोरोना ग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असून ऑक्सिजनचा तुटवडा भासताना दिसतोय. अशातच बारामती ॲग्रो या संस्थेच्या मार्फत आमदार रोहित पवार यांनी कोकण विभागासाठी 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देऊन जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी प्रशासनाला मदतीचा हात दिला. बारामती ॲग्रो संस्थेने हे 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज कोकण विभागाचे महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना सुपूर्द केले. रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत […]

Mumbaitak
follow google news

राज्यात कोरोना ग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असून ऑक्सिजनचा तुटवडा भासताना दिसतोय. अशातच बारामती ॲग्रो या संस्थेच्या मार्फत आमदार रोहित पवार यांनी कोकण विभागासाठी 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देऊन जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी प्रशासनाला मदतीचा हात दिला. बारामती ॲग्रो संस्थेने हे 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज कोकण विभागाचे महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना सुपूर्द केले.

हे वाचलं का?

रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत तसंच त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावा, यासाठी सध्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गरज आहे. या उपकरणांची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे तसंच ही उपकरणे महागडी असल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करणं शक्य होत नाही. राज्यात ऑक्सिजन, औषधं, उपकरणांचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकारमार्फत प्रयत्न सुरू असताना रोहित पवार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

कौतुकास्पद! Tauktae Cyclone असूनही डॉक्टर, नर्सेस, कोरोना रूग्णांसाठी डबेवाल्यांची सेवा

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये एकूण 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वाटप करण्याचं लक्ष्य या संस्थेने ठेवलं असून याचा प्रारंभ कोकण विभागात करण्यात आला आहे. कोकण विभागासाठी 1 लिटरचे 7 आणि 10 लिटरचे 17 असे एकूण 24 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले आहेत.

कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयांतील ग्रामीण भागात ऑक्सिजन तुटवडा होऊ नये. यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून, तसंच या ठिकाणी असलेल्या कोव्हिड केअर केंद्रांमध्ये अचानकपणे गंभीर होणाऱ्या किंवा ऑक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार पुरवण्याच्या दृष्टीने या ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरचा उपयोग करण्यात येणार आहे. बारामती ॲग्रो संस्थेने प्रशासनाला केलेल्या या सहकार्याबद्दल कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संस्थेचे प्रमुख आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत.

    follow whatsapp