पंढरपूर: दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर आता पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आपली हक्काची जागा राखण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. कारण इथं भाजपने त्यांच्यासमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूरमध्ये रात्रीच्या दिवस करुन प्रचार करत असल्याचं दिसत आहे.
ADVERTISEMENT
प्रकृतीच्या कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रचारासाठी अद्याप तरी पंढरपूरमध्ये आलेले नाहीत. त्यामुळे उमेदवार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आहे. त्यातच भाजपने या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी 80 हजार मते मिळवणारा पंढरपुरचा परिचारक गट तर 54 हजार मते मिळवणारे मंगळवेढयाचे समाधान आवताडे या दोघांना एकत्र करण्याचे काम केलं आहे. यावेळी भाजपचे अनेक दिगग्ज नेते कामाला लागले आहेत.
‘आपलं नाणं खणखणीत, कारण आपल्या मागं चुलता उभा हाय’, अजित पवारांचा खास VIDEO
भाजपच्या या नव्या चालीने राष्ट्रवादी काँग्रेससमोरील आव्हान वाढलं आहे. त्यातच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार व शिवसेनेच्या बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिलेल्या शैला गोडसे यांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे अजित पवार पायाला भिंगरी लावून प्रचार दौरे करीत आहेत.
भगीरथ भालके यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार सध्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्याचाच भाग म्हणून लोकसभेच्या वेळी काँगेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कल्याण काळे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. कल्याण काळे यांना आपल्या गोटात सामील केल्यानंतर अजित पवारांनी अनेक गावागावत जाऊन प्रचार सभा घेतल्या आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून भगीरथ भालकेंना उमेदवारी
यावेळी अजित पवार हे पंढरपूरमध्ये धनगर समाजाचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. या मतदार संघात धनगर समाजाचे जवळजवळ 70 हजाराहून अधिक मतदार आहे. याठिकाणी धनगर समाजाच्या अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. धनगर समाजाची मते आपल्याला मिळावी यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री राम शिंदे हे पंढरपूरमध्ये तळ ठोकून आहेत. अशावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी तुमच्या मागण्या पूर्ण करुन तुमच्या मागे उभे राहिल, असं सांगत त्यांना या मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करत आहे.
या निवडणुकीत मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे.
या साऱ्या भेटी झाल्यानंतर 11 वाजेच्या दरम्यान अजित पवार यांनी आपला मुक्काम आमदार संजय मामा शिंदे यांच्या गावाकडे वळवला. एकंदर शरद पवार यांच्या अनुपस्थित अजित पवारांवर ही पोटनिवडणूकित उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी आहे. त्या विजयावर अजित दादांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT