रुप मनोहर… विठुरायाची महापूजा संपन्न, माघ यात्रा भाविकांविना

मुंबई तक

• 05:08 AM • 23 Feb 2021

पंढरपूर: पंढरपूरच्या चार प्रमुख यात्रांपैकी असणारी माघी यात्रा आज (23 फेब्रुवारी) ही भाविकांनाविना पार पडली. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूरसह 10 गावांमध्ये संचारबंदी जाहीर केली असल्याने वारकरी भाविकांना घरी राहूनच आपल्या विठूरायाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यात्रा कालावधीसाठी पंढरपूरसह 10 गावांसमध्ये संचार […]

Mumbaitak
follow google news

पंढरपूर: पंढरपूरच्या चार प्रमुख यात्रांपैकी असणारी माघी यात्रा आज (23 फेब्रुवारी) ही भाविकांनाविना पार पडली. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूरसह 10 गावांमध्ये संचारबंदी जाहीर केली असल्याने वारकरी भाविकांना घरी राहूनच आपल्या विठूरायाचं दर्शन घ्यावं लागणार आहे.

हे वाचलं का?

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यात्रा कालावधीसाठी पंढरपूरसह 10 गावांसमध्ये संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट निर्मनुष्य पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हरिनामाचा जयघोष होतो, लाखोंच्या संख्याने वारकरी भाविक दाखल होतात तेथे फक्त पोलीस बंदोबस्त सध्या पाहायला मिळत आहे.

विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

माघवारी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. या फुलांच्या सजावटीसाठी तब्बल 1 टन फुलांचा वापर करण्यात आला असून पुण्याचे भाविक सचिन चव्हाण यांच्यावतीने ही सजावट करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा मंदीर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. तर रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदीर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदीर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

PHOTO Gallery: पंढरपुरात विठु-रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न

यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. मात्र भाविकांविना पंढरीनगरी सुनीसुनी वाटत आहे. मात्र या वेळेस भावनिक न होता कोरोनाच्या नियमांचे पालन करून आपण व समाजाला सुरक्षित ठेवण्यातच सर्वांचे हित आहे. हे लक्षता घेता वारकरी भाविकांनी देखील प्रशासनाला सहकार्य केल्याचे पाहायला मिळत आहे.

    follow whatsapp