–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
अंधश्रद्धेमुळे ६ वर्षाच्या मुलीला जन्मदात्याने मायबापानीच संपवल्याची अंगावर शहारे आणणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे. नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत ही भयंकर घटना घडली. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी आईवडिलांसह तीन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ६ वर्षाच्या मुलीला भूताने पछाडल्याचा संशय आईवडिलांना आला. त्यांनी भूताला पळवून लावण्यासाठी मुलीला मारलं. या बेदम मारामुळे मुलीचा मृत्यू झाला. सिद्धार्थ चिमणे, रंजना सिद्धार्थ चिमणे आणि रंजना बनसोड अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत.
मुलीसोबत नेमकं काय घडलं?
झालं असं की, काही दिवसांपासून सिद्धार्थ चिमणे आणि रंजना चिमणे यांच्या मुलीची तब्येत बरी नव्हती. ती बरी होत नसल्याने आपल्या मुलीला भूताने पछाडल्याचा संशय पती-पत्नीला (सिद्धार्थ चिमणे आणि रंजना चिमणे) आला.
नागपूर: दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; ‘या‘ कारणासाठी केली भावाची आणि त्याच्या प्रेयसीची हत्या
याच अंधश्रद्धेमुळे सिद्धार्थ चिमणे आणि रंजना चिमणे यांनी मुलीच्या अंगातील भूताला बाहेर काढण्यासाठी तिला मारलं. दोघांनी मुलीला आळीपाळीने बेदम मारलं. या बेदम मारामुळे ६ वर्षाच्या मुलीने जागीच जीव सोडला. भयंकर प्रकार म्हणजे आईवडिलांनी या मारहाणीचा व्हिडीओही बनवला.
मुलीच्या आईवडिलांचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त
पोलिसांनी आरोपींचा मोबाईल जप्त केला. या मोबाईलमधील मुलीला मारहाण करतानाचा व्हिडीओ बघून पोलीसही हादरले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सिद्धार्थ चिमणे, रंजना चिमणे आणि रंजना बनसोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांनाही अटक केली आहे.
नागपूर: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेलेल्या तरुणाचा मृतदेहच सापडला; रूममध्ये काय घडलं?
नागूपर शहर पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. घटनेनंतर पोलिसांनी मयत मुलीच्या आईवडिलांसह अन्य एका व्यक्तीला अटक केली आहे. त्यांच्या हत्येचा तसेच मानवी बळी दिल्याच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना रविवारी (७ ऑगस्ट) न्यायालयासमोर हजर केलं जाईल, असं पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT