पनवेलमध्ये तिकिट देण्याच्या वादातून प्रवाशाने कंडक्टरला झोडपलं

मुंबई तक

13 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:08 AM)

बेलापूर खोपोली मार्गावरच्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस मध्ये तिकिट देण्यावरून एका अज्ञात प्रवासी आणि वाहक सुरज भोईर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.संबधित प्रवाशाने वाहकाला जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाला असून पोलीस या प्रवाशाचा शोध घेत आहेत. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बेलापूर ते खोपोली या ५८ नंबरच्या बस वाहकाला […]

Mumbaitak
follow google news

बेलापूर खोपोली मार्गावरच्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस मध्ये तिकिट देण्यावरून एका अज्ञात प्रवासी आणि वाहक सुरज भोईर यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.संबधित प्रवाशाने वाहकाला जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हीडिओ व्हायरल झाला असून पोलीस या प्रवाशाचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बेलापूर ते खोपोली या ५८ नंबरच्या बस वाहकाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाला असून, मारहाण करून ही व्यक्ती पळून गेल्याचे या व्हीडीओत दिसून येत आहे. या व्यक्तीविरोधात गुन्हा करण्यात आला दाखल आहे. या हाणामारीत वाहक सुरज भोईर किरकोळ जखमी झाला आहे.

पनवेल बस स्थानकात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. ५८ नंबरची बस बेलापूर ते खोपोली या मार्गावर धावते.या बस मध्ये तिकीट देण्यावरून वाहक सुरज भोईर व प्रवाश्यात जोरदार वादावादी झाली. गुरुवारी ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करत वाहकास मारहाण करण्यास सुरुवात झाली. बसमधील इतर प्रवाश्यांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.मात्र संतप्त प्रवाशी वाहकाच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण करीत होता.यातील एका प्रवाशाने या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले.हा व्हिडिओ वायरल झाला आहे.बसमधून खाली उतरल्यावर हा वाद सुरूच होता.

प्रवाशांनी पोलिसांना फोन करून पाचारण केले.या दरम्यान या प्रवाशाला पकडून ठेवले होते मात्र पोलीस येत असल्याचे समजताच हा प्रवासी पळून गेला.याविरोधात ३५३ अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. ही घटना पनवेल स्थानकात घडली.

    follow whatsapp