यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (vasantrao naik medical college yavatmal) गुरुवारी धक्कादायक घटना घडली. रात्री डॉक्टरांकडून (Doctor) वार्डमध्ये रुग्णांची तपासणी सुरू होती. याचवेळी एका रुग्णाने प्राणघातक हल्ला केला. यात दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णालयात आंदोलन (Doctors protest After Patient Attacks) सुरू केलं आहे.
ADVERTISEMENT
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येनं रुग्ण येतात. दरम्यान, गुरूवारी रात्री दोन डॉक्टरांवर रुग्णाकडूनच चाकूहल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे. यामुळे रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ उडाला.
दोन डॉक्टरांवर हल्ला : यवतमाळमधील रुग्णालयात काय घडलं?
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुरुवारी रात्री डॉक्टरांकडून रुग्णांची पाहणी सुरू होती. याच वेळी उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने डॉक्टरांवर चाकूने हल्ला केला. यात दोन डॉक्टर जखमी झाले. डॉ. जेबिस्टॅन पॉल आणि डॉ. अभिषेक झा असं चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत.
यातील एका डॉक्टरच्या मानेजवळ चाकूने वार करण्यात आलेला आहे. डॉक्टर या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.
शिकाऊ डॉक्टरांची निदर्शने, अधिष्ठातांना हटवण्याची मागणी
या घटनेनंतर संतप्त झालेल्या शिकाऊ डॉक्टरांनी शासकीय रुग्णालय परिसरामध्ये आंदोलन सुरू केलं. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी शिकवू डॉक्टरांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत डीन हटावची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी डॉक्टर पाल यांच्या हत्या प्रकरणानंतर आज पुन्हा एकदा शासकीय महाविद्यालयात घडलेल्या या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT