Balasaheb Thorat Latest news: काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सुप्त संघर्ष विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून झालेला गोंधळ आणि त्यानंतर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून वाद शिगेला गेला आहे. काँग्रेसमधील काही नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज असून, बाळासाहेब थोरातांनी थेट काँग्रेस नेतृत्वाकडे तक्रार केलीये. दरम्यान, बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीये.
ADVERTISEMENT
नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रं आल्यापासून पक्षातील धुसफूस सातत्यानं चर्चेत आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील नेत्यांचे नाना पटोलेंच्या नेतृत्वाबद्दलचे मतभेद जाहीरपण समोर आले.
सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपानंतर बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीला पत्र लिहिलं होतं. बाळासाहेब थोरातांनी या पत्रात नाना पटोले यांच्या नेतृत्वाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आता बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
Nana Patole यांची स्वपक्षातूनच मोठी कोंडी? काँग्रेसमधील खदखद वाढली
बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती असून, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे. काँग्रेसनेतृत्वाला लिहिलेल्या पत्रातच बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.
थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोले म्हणाले,…
थोरातांच्या राजीनाम्याबद्दल विचारल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “मी बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपण असं झालं, तसं झालं सांगत आहात, पण असं काहीही झालेलं नाही. आमच्याकडे त्यांचा कोणताही राजीनामा आलेला नाही.”
“कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते, पण काही लोक वर्षभर घेत नव्हते. मागच्या महिन्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेतली होती. आता आमच्या पोटनिडवणुका आहेत. त्याचबरोबर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात जिंकून आलेल्या आमदारांचा सत्कार केला जाणार आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब
“कार्यकारिणीची पुढची बैठक आम्ही 15 तारखेला ठेवली आहे. त्यामध्ये पक्षाच्या पातळीवर या सर्व गोष्टींची चर्चा केली जाईल. काँग्रेसला महाराष्ट्रात यश मिळण्यास सुरूवात झालीये”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT