मुंबई: ब्रोकरेज फर्म Macquarie Securities India ने या महिन्यात Paytm च्या महसुलात घट होण्याच्या अपेक्षेने स्टॉकसाठी 900 रुपयांचे टार्गेट दिले होते. मात्र दोन आठवड्यात पेटीएमचे शेअर हे 900 रुपयांच्या देखील खाली आले आहे. खरं पेटीएमच्या शेअर्समध्ये एवढी पडझड होईल याची कुणीही कल्पना केली नव्हती. पण यामुळे गुंतवणूकदारांचं फारच नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT
वास्तविक, पेटीएमचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर Macquarie ने 1200 रुपयांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर त्याच महिन्यात ब्रोकरेज फर्मने पुन्हा टार्गेट कमी करून 900 रुपये एवढं दिलं होतं. पण आता सोमवारी बाजार उघडताच पेटीएमचे शेअर 900 रुपयांच्या खाली घसरून 881 रुपयांवर आला. शेअर मार्केट बंद होताना पेटीएमचा शेअर 4.61% टक्क्यांनी घसरून 916 रुपयांवर बंद झाला.
पेटीएम स्टॉक नवीन विक्रमी नीचांकावर
सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचे वर्चस्व राहिले. सोमवारच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 1,545 अंकांनी घसरून 57,491 वर बंद झाला. तर निफ्टी 468.05 अंकांनी घसरला आणि 17149 अंकांवर बंद झाला.
पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications Ltd चे शेअर्स लिस्टिंग झाल्यापासून घसरत आहेत. त्याची लिस्टिंग 18 नोव्हेंबर 2021 रोजी झाली होती. त्याची इश्यू किंमत 2,150 रुपये होती. लिस्टिंगच्या दिवशीही त्यात मोठी घसरण झाली आणि ती 1,961.05 रुपयांपर्यंत खाली आली. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स लिस्टिंग किंमतीपर्यंत पोहोचलेले नाहीत.
पेटीएमच्या एका शेअरची इश्यू किंमत ही 2150 रुपये होती, जी आता 900 रुपये झाली आहे. म्हणजेच हा शेअर त्याच्या इश्यू किंमतीपेक्षा तब्बल 1234 रुपयांनी घसरला आहे. म्हणजेच ज्यांना IPO मध्ये शेअर्सचा एक लॉट वाटप करण्यात आला आहे त्यांचे तब्बल 7404 रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामुळे आयपीओ गुंतवणूकदारांची निम्मी गुंतवणूक नष्ट झाली आहे.
D-Martच्या दमानींनी खरेदी केला 1001 कोटींचा बंगला!
आता जोपर्यंत पेटीएमचा शेअर वधारत नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांना फक्त वाट पाहण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करता येणार नाही. कारण पेटीएमचे शेअर एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरतील असा कुणीही अंदाज लावला नव्हता. मात्र, या शेअरने गुंतवणूकदारांची साफ निराशा केली आहे.
ADVERTISEMENT