Petrol Diesel Price Hike देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडले आहेत. पेट्रोल दर प्रति लिटर 29 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी महाग झालं आहे. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.66 रूपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 87.41 रूपये प्रति लिटर झाली आहे.
ADVERTISEMENT
राजस्थानमध्ये सर्वाधिक दर
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठलाय. येथे एका लिटर पेट्रोलसाठी 107.79 रुपये मोजावे लागत आहेत. तर येथे डिझेल 100.51 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. मध्य प्रदेशमधील अनुपनगरमध्ये पेट्रोल 107.43 रुपयांना तर डिझेल 98.43 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. रीवामध्ये पेट्रोल 107.06 रुपये आणि डिझेल 98.10 रुपये प्रति लिटर दराने मिळतंय.
समजून घ्या : पेट्रोल 100 रूपयांना का मिळतंय?
मुंबईत पेट्रोल 101 रूपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. परभणीत तर पेट्रोल 105 रूपये लिटर झालं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, लडाख यासह केंद्रशासित राज्यांमध्येही पेट्रोल प्रति लिटर शंभर रूपयांच्या पुढे गेले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 102. रूपये 82 पैसे प्रति लिटर तर डिझेल 94 रूपये 84 पैसे प्रति लिटर झालं आहे. जर दरवाढ होत राहिली तर लवकरच डिझेलही 100 रूपये लिटरच्या पुढे जाऊ शकतं.
आपल्या देशात पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक व्हॅट राजस्थानमध्ये लावण्यात येतो. त्यानंतर मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगण या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातल्या परभणीत पेट्रोल 24 पैशांनी महाग झालं आहे त्यामुळे परभणीत पेट्रोलचे दर 105 रूपये 18 पैसे प्रति लिटर इतके गेले आहेत. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल मिळणारं शहर परभणी आहे. तर परभणीत डिझेलही 95 रूपयांच्या पुढे गेलं आहे. यंदाच्या वर्षात 4 पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 24 वेळा वाढ झाली. आत्तापर्यंत पेट्रोल 5.50 रूपये तर डिझेल 6.63 रूपये प्रति लिटर महागलं आहे.
आता सरकारला पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा अधिकार नाही– फडणवीसांचा टोला
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
दिल्ली –
पेट्रोल –96.66 रुपये प्रति लिटर
डिझेल – 87.41 रुपये प्रति लिटर
मुंबई –
पेट्रोल – 102.82 रुपये प्रति लिटर
डिझेल – 94.84 रुपये प्रति लिटर
चेन्नई –
पेट्रोल – 97.91 रुपये प्रति लिटर
डिझेल – 92.04 रुपये प्रति लिटर
कोलकाता –
पेट्रोल – 96.58 रुपये प्रति लिटर
डिझेल – 90.25 रुपये प्रति लिटर
ADVERTISEMENT