मुंबई: Petrol and Diesel Prices Today 18 June 2021: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज (18 जून) पुन्हा एकदा वाढल्या आहेत. गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर आज मात्र पुन्हा दर वाढले आहेत. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 27 पैशांची वाढ केली. तर डिझेलच्या दरात 28 पैशांची वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर हे 103.08 रुपये प्रति लिटर एवढे झाले आहेत. तर डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर डिझेलचे दर प्रति लिटर 95.14 रुपये प्रतिलीटर जाऊन पोहचलं आहे.
गेल्या 27 दिवसांत म्हणजेच 4 मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.61 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर या काळात डिझेल देखील प्रति लिटर 6.91 रुपयांनी महाग झालं आहे.
जाणून घ्या मोठ्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती:
आज (18 जून) दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दर किती आहेत जाणून घ्या.
-
मुंबई- पेट्रोल 103.08 रुपये तर डिझेल 95.14 रुपये प्रति लिटर आहे.
-
बंगळुरू- पेट्रोलची किंमत 100.17 रुपये तर डिझेलची किंमत 92.97 रुपये प्रति लिटर आहे.
-
भोपाळ- पेट्रोल 105.13 रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 96.35 रुपये आहे.
-
चेन्नई- आज पेट्रोलची किंमत 98.14 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 92.31 रुपये प्रति लिटर आहेत.
-
कोलकाता- आज पेट्रोलची किंमत 96.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 90.54 रुपये प्रति लिटर आहेत.
-
दिल्ली- पेट्रोल 96.93 रुपये होते तर डिझेलची किंमत 87.69 रुपये प्रति लिटर आहे.
Petrol-Diesel Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीच्या जवळपास, प्रचंड महागाईने मुंबईकर हैराण
यापूर्वी काल (गुरुवार) तेलाचे दर हे स्थिर होते. त्यामुळे मुंबई पेट्रोलचे दर प्रति लिटर 102.82 रुपये होते तर डिझेलचे दर प्रति लिटर 94.84 रुपये होते. यापूर्वी बुधवारी पेट्रोल 29 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागले होते.
काल (17 जून) मुख्य शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नेमके दर काय होते?
-
दिल्ली- पेट्रोल 96.66 रुपये तर डिझेल 87.41 रुपये प्रति लिटरने विकले गेले
-
मुंबई- पेट्रोल 102.82 रुपये तर डिझेल 94.84 रुपये प्रति लिटर होते
-
चेन्नई – पेट्रोलची किंमत 97.91 रुपये आणि डिझेलची किंमत 94.04 रुपये प्रति लिटर होती.
-
कोलकाता- पेट्रोल 96.58 रुपये तर डिझेल 90.25 रुपये प्रति लिटर होते
-
बंगळुरू- पेट्रोलची किंमत 99.89 रुपये तर डिझेलची किंमत 92.66 रुपये प्रति लिटर होती.
-
भोपाळ- पेट्रोलची किंमत 104.85 रुपये तर डिझेलची किंमत 96.05 रुपये प्रति लिटर होती.
पेट्रोल दरवाढीविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, पेट्रोल पंपावर झोपून नोंदवला निषेध
आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतींमध्ये दररोज बदल होतात. अशा परिस्थितीत आपल्याला दररोज फक्त एका एसएमएसद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत समजू शकणा्र आहे. यासाठी इंडियन ऑईल (IOCL)च्या ग्राहकांना आरएसपी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर आपल्याला पेट्रोल-डिझेलच्या किंमती मेसेजवरच समजू शकतील.
ADVERTISEMENT