सात दिवसात सहावेळा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर, वाचा काय आहेत आजचे दर?

मुंबई तक

• 03:17 AM • 28 Mar 2022

सात दिवसात सहा वेळा इंधन दर म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर झाले. नव्या दरांनुसार पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 35 पैशांनी महाग झालं आहे. आज सकाळी सहा वाजता नवे दर लागू झाले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आयात आणि निर्यातीवर परिणाम […]

Mumbaitak
follow google news

सात दिवसात सहा वेळा इंधन दर म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर झाले. नव्या दरांनुसार पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 35 पैशांनी महाग झालं आहे. आज सकाळी सहा वाजता नवे दर लागू झाले आहेत.

हे वाचलं का?

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या आयात आणि निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज म्हणजेच 28 मार्च म्हणजेच आज सकाळपासून पेट्रोल आणि डिझेल महाग झालं आहे. पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी महाग झालं आहे. सात दिवसात पेट्रोलची आणि डिझेलच्या किंमती सहावेळा वाढल्या आहेत. 28 मार्चच्या दर वाढीमुळे सात दिवसात पेट्रोल ४ रूपयांनी तर डिझेल ४ रूपये १० पैशांनी प्रति लिटर महाग झालं आहे.

मुंबईत पेट्रोल 31 पैसे तर डिझेल 37 पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 114.18 रूपये इतके झाले आहेत, तर डिझेल ९८.४६ रूपये प्रति लिटर झालं आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 99.41 रूपये प्रति लिटर झालं आहे तर डिझेल ९०.७७ रूपये प्रति लिटर झालं आहे.

महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर?

पुण्यात पेट्रोल 113 रूपये 90 पैसे प्रति लिटर झालं आहे तर डिझेल 96 रूपये 76 पैसे प्रति लिटर झालं आहे

नाशिकमध्ये पेट्रोल 114.42 रूपये प्रति लिटर तर डिझेल 97.34 रूपये लिटर झालं आहे.

राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये झालं आहे, या शहरात पेट्रोलचा दर 116.86 रूपये प्रति लिटर आहे तर डिझेल 99.41 रूपये प्रति लिटर झालं आहे

रत्नागिरीमध्ये पेट्रोल 115.33 रूपये लिटर तर डिझेल 98.45 रूपये लिटर झालं आहे

साताऱ्यात पेट्रोल 114.32 रूपये लिटर तर डिझेल 97.10 रूपये लिटर झालं आहे

नागपूरमध्ये पेट्रोल 114.05 रूपये लिटर तर डिझेल 96.89 रूपयांवर पोहचलं आहे

औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 115.20 रूपये लिटर दर डिझेलचा दर 98.01 रूपयांवर पोहचला आहे

    follow whatsapp