Ahilyanagar News : राज्यभरात काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं जल्लोष करण्यात आला. तर काही ठिकाणी काल रात्री 12 वाजेपासून फटाके फोडत जल्लोषाला सुरूवात झाली होती. हा सर्व आनंदोत्सव सुरू असताना अहिल्यानगरमध्ये काल एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रॅलीमध्ये शिवरायांचे पोस्टर, त्यांचे विचार लिहिलेले पोस्टर दिसण्याऐवजी या रॅलीमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो दिसले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Pune Crime : कोयते दाखवून दहशत पसवणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धींड
अहिल्यानंतरमध्ये निघालेल्या रॅलीमध्ये तुरूंगात असलेले गुंड लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर घेऊन काही तरूण नाचत असल्याचं दिसलं. तसंच योगी आदित्य नाथ, नितेश राणे आणि अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही पोस्टर या तरूणांच्या हातात दिसले. विशेष म्हणजे ही रॅली कोतवाली पोलीस स्टेशनजवळ आणि मशिदीसमोर येताच तरुणांनी हे सर्व पोस्टर्स हातात घेतलेले दिसले. तसंच नितेश राणे यांच्या पोस्टरवर वादग्रस्त वाक्यही लिहिण्यात आलेले होते.
हे ही वाचा >>Delhi Chief Minister : परवेश वर्मा नाही, 'या' महिला नेत्याला मिळणार दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची संधी
दरम्यान, अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणाऱ्या, जुलमी आणि शोषण करणाऱ्या वृत्तींना गाडून, सर्व जाती-धर्मियांना गुण्यागोविंदानं नांदता येईल असं स्वराज्य अभिप्रेत असणाऱ्या शिवरायांच्याच जयंतीच्या दिवशी अशा गुन्हेगारांचे पोस्टर झळकावणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT
