विधवा महिलेकडून ऑनलाईन लाच स्विकारणारा मंत्रालयातील कर्मचारी निलंबीत

मुंबई तक

• 07:11 AM • 23 Feb 2022

पेट्रोल पंप मंजूर करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने एका मंत्रालयीन कर्मचाऱ्याने विधवा महिलेकडून ऑनलाईन स्वरूपात लाच स्वीकारली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी संबंधित कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबित केलं आहे. महेंद्र नांदले (वय ४०) असं या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, दिघी येथील लष्करातून निवृत्त झालेल्या दिवंगत नगरसेवकाच्या पत्नीने स्वतःच्या मालकी जागेत मुलाच्या […]

Mumbaitak
follow google news

पेट्रोल पंप मंजूर करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने एका मंत्रालयीन कर्मचाऱ्याने विधवा महिलेकडून ऑनलाईन स्वरूपात लाच स्वीकारली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी संबंधित कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबित केलं आहे. महेंद्र नांदले (वय ४०) असं या अधिकाऱ्याचं नाव असल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, दिघी येथील लष्करातून निवृत्त झालेल्या दिवंगत नगरसेवकाच्या पत्नीने स्वतःच्या मालकी जागेत मुलाच्या नावे पेट्रोल पंप मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, भारत पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल पंप देखील मंजूर केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात या जागेवर पोलीस ठाण्याचे आरक्षण असल्याचे समोर आले. त्यामुळे महिलेने जागा बदलून दुसऱ्या जागेवर पेट्रोल पंप मिळण्याची विनंती केली होती. परंतू यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीने नव्या जागेवर हा पंप सुरू करण्यासाठी पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र मागितले.

त्यामुळे तक्रारदार महिलेने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय गाठले. त्यावेळेला तत्कालीन मंत्रालयीन कर्मचारी परदेशी यांनी तक्रारदार महिलेला प्रमाणपत्र दिलं. परंतू त्यामध्ये काही त्रुटी असल्याने भारत पेट्रोलियम कंपनीने त्यांना दुसरे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदार महिलेच्या मुलीने आयुक्त कार्यालयात येऊन सध्या नियुक्तीस असलेल्या नांदले याची भेट घेतली. त्यावेळी नांदले याने प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार महिला आणि त्यांच्या मुलीने नांदले याच्या फोनपेवर एकूण साडेआठ हजार रुपये पाठवले. तसेच, वेळोवेळी आणखी रोख स्वरूपातही पैसे दिले.

Pune Crime : गुन्हे करुन त्याचा उपयोग करायचा कथा लेखनासाठी; लेखकाला सायबर पोलिसांनी केली अटक

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना या घटनेची माहिती कळताच नांदले यांनी महिलेकडून घेतलेले पैसे त्यांना परत पाठवले. आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तक्रारदार महिलेची चौकशी करुन या प्रकरणात नांदले या कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आहे.

Whatsapp वर ‘रेड हार्ट’ पाठवलं तर थेट जेलमध्ये रवानगी?

    follow whatsapp