मृत्यूशी अपयशी झुंज, पिंपरी-चिंचवडमधील 45 वर्षीय सुपरवायझरचा बार्ज P-305 दुर्घटनेत मृत्यू

मुंबई तक

• 04:17 AM • 21 May 2021

मुंबई: तौकताई चक्रीवादळामुळे बार्ज P-305 या जहाजाला मुंबईच्या नजीक जलसमाधी मिळाली आहे. मात्र असं असलं तरीही भारतीय नौदलाच्या टीमकडून सातत्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. आतापर्यंत या जहाजावरील 49 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागले आहेत. याशिवाय आतापर्यंत अनेक जण हे बेपत्ता असल्याचं समजतं आहे. त्यातच याच बोटीवर असणाऱ्या निलेश पिताळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 45 […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: तौकताई चक्रीवादळामुळे बार्ज P-305 या जहाजाला मुंबईच्या नजीक जलसमाधी मिळाली आहे. मात्र असं असलं तरीही भारतीय नौदलाच्या टीमकडून सातत्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. आतापर्यंत या जहाजावरील 49 जणांचे मृतदेह नौदलाच्या हाती लागले आहेत. याशिवाय आतापर्यंत अनेक जण हे बेपत्ता असल्याचं समजतं आहे. त्यातच याच बोटीवर असणाऱ्या निलेश पिताळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय निलेश पिताळे हे मूळचे पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी होते.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, बार्ज P-305 या जहाजावरील 188 लोकांना वाचविण्यात नौदलाला यश आलं पण या दुर्घटनेत 49 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यामध्ये पिंपरीच्या निलेश पिताळे यांचाय देखील समावेश आहे. निलेश हे मागील दोन वर्षापासून या बार्जवर HSE सुपरवायझर म्हणून काम करत होते. पण तौकताई चक्रीवादळामध्ये बार्ज बुडाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

बार्ज P 305 Accident : कंपनीला कामावर असणाऱ्या लोकांच्या जिवाची किंमत नाही, बेपत्ता कर्मचाऱ्याच्या भावाचा आरोप

निलेश यांचा भाऊ विश्वनाथ पिताळे यांनी या सगळ्या प्रकाराबाबत प्रचंड दु:ख व्यक्त केलं असून घडल्या प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान, 15 मे रोजी त्यांचं आपल्या भावाशी बोलणं झालं होतं. त्यावेळी निलेश यांनी त्यांना सांगितलं होतं की, ‘मी आता जहाजावर जाणार आहे आणि तिथे नेटवर्क नसल्याने माझं काही आपल्याशी बोलणं होऊ शकत नाही. मी घरी परतलो की, फोन करेन. पण त्यानंतर तौकताई चक्रीवादळ आलं आणि त्यामध्ये त्यांची बार्ज बुडाली आणि मी माझ्या भावाला गमावलं.’

दरम्यान, चक्रीवादळ मुंबईत आल्यानंतर नौदलाने भर समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी तात्काल बचाव मोहीम हाती घेतली होती. जी अद्यापही सुरुच आहे. सध्या INS कोच्चीसह 5 INS जहाजं अद्याप बचाव कार्य करत आहेत. बार्ज P-305 वर एकूण 261 जण होते. ज्यापैकी 188 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर 49 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर इतरांचा अद्यापही नौदलाकडून शोध सुरुच आहे.

नऊ तास Tauktae वादळाशी झुंज देऊन सातारचा पठ्ठ्या सुखरुप घरी

शोध मोहीम अजूनही सुरू

19 तारखेच्या दुपारी P 305 या बार्ज दुर्घटनतेल्या 186 जणांना वाचवण्यात आलं आहे. या बार्जवर 261 जण होते. अद्यापही सर्च ऑपरेशन म्हणजेच शोध मोहीम सुरू आहे. आम्ही ONGC, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या माध्यमातून हरवलेल्यांचा शोध आम्ही घेत आहोत.


Afcons इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितलं P 305 बार्जचा अपघात नेमका कसा झाला?

कोणत्या बार्ज वर किती कर्मचारी होते?

P 305 या बार्जवर एकूण 261 जण होते त्यापैकी 13 कर्मचारी हे Afcons होते

SS3 या बार्जवर एकूण 202 जण होते आणि त्यापैकी 8 जण Afcons चे कर्मचारी होते

Gal Constructor या बार्जवर 137 जण होते आणि त्यापैकी 8 जण Afcons चे कर्मचारी होते

Trintiy Nissie या बार्जवर 268 जण होते त्यापैकी 7 जण Afcons चे कर्मचारी होते

Falcon Warrior या बार्जवर 203 जण होते त्यापैकी 6 Afcons चे कर्मचारी होते

Ocean 303 या बार्जवर 170 जण होते त्यापैकी 8 Afcons चे कर्मचारी होते

    follow whatsapp