हिंगोली जिल्ह्यातील डोनवाडा येथे बायको हरवल्याची तक्रार देणारा पतीच खुनी निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात कुरुंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतक महिलेचा पती बालाजी कुरडेला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती बालाजी आणि त्याच्या पत्नीत चारित्र्याच्या संशयावरुन नेहमी भांडणं व्हायची. याच वादातून बालाजीने मंगळवारी रात्री २ वाजल्याच्या दरम्यान डोनवाडा येथील शिवारात आपली पत्नी कमलचा गळा आवळून खून केला. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी बालाजीने पत्नीचा मृतदेह विहीरीत फेकून दिला.
दरम्यान, खून केल्याच्या दुसऱ्या दिवशी बालाजीने आपली पत्नी कमल हरवल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. बालाजीच्या चौकशीत तो काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर बुधवारी बालाजीची पत्नी कमलचा मृतदेह विहीरीत आढळून आल्यानंतर पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात कमलचा खून हा गळा दाबून केल्याचं स्पष्ट झालं.
उस्मानाबाद : अवैध दारु अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी, लाखोंचा मुद्देमाल जप्त, २८ गुन्हे दाखल
यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा बालाजीची चौकशी केली. यावेळी पोलिसी खाक्यासमोर बालाजीने आपला गुन्हा कबूल केला. ज्यानंतर पोलिसांनी पत्नी हरवल्याची तक्रार देणाऱ्या बालाजीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
भयंकर घटना! मित्रासोबत बसस्थानकात बसलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT