सोलापूरमधल्या मंगळवेढा तालुक्यातील मारोळी गावातील घर फोडून ब्रिटिशकालीन राजे-महाराजांच्या कालावधीतील चांदीचे नाणी चोरल्याप्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून, त्याच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 2 लाख 2 हजार 180 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
ADVERTISEMENT
येलप्पा ऊर्फ खल्या अद्रक शिंदे (वय 40, रा. कर्नाटक, सध्या दत्त नगर, मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. 27 मार्च रात्री 10.20 ते दि. 28 मार्च 2022 पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान मारोळी येथे अज्ञात चोरट्यांनी संपता लक्ष्मण पांढरे (वय 42) व त्यांचे शेजारी राहणारे मारुती यशवंत शिंदे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोंयंडा उचकटून सोन्या-चांदीचे दागिने,नाणी आणि रोख रक्कम चोरून नेली होती.
यलप्पा शिंदे याला पंढरपूर येथे जाऊन अटक केली , चौकशीत त्याने लक्ष्मी दहिवडी , सलगर (ब्रु.), मंगळवेढा व तेलगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे असे एकूण पाच ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले.ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर,गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे,धनराज गायकवाड,अक्षय दळवी,समीर शेख यांनी पार पाडली.
ADVERTISEMENT