Jenna Jameson Guillain-Barre syndrome: एकेकाळी प्रसिद्ध पॉर्न स्टार असलेल्या जेना (Jenna Jameson) हिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे तिला नीट चालता देखील येत नाहीए. जेना Guillain-Barre syndrome ने ग्रस्त आहे. या आजारात व्यक्तीच्या शरीरातील नसा या कमकुवत होतात.
ADVERTISEMENT
डेली स्टारच्या वृत्तानुसार, जेना जेमसनला काही दिवसांपासून नीट चालता येत नव्हते. त्यानंतर तिला रुग्णालयात जावे लागले. रूग्णालयात तपासणीदरम्यान, तिला समजलं की Guillain-Barre syndrome नावाच्या न्यूरोलॉजिकल डिस्ऑर्डरने ती ग्रस्त आहे. 47 वर्षीय जेना ही अडल्ट इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.
या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे ती आता मात्र अंथरुणाला खिळली आहे. तिला आता बेडवरून हलताही येत नाहीए. तिचा पती लिओर बिटनने (Lior Bitton) ती सध्या कोणत्या स्थितीत आहे हे दाखविणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या दाम्पत्याला 4 वर्षांची मुलगी देखील आहे. जी आपल्या आईच्या आजारपणामुळे खूपच हळवी झाली आहे.
लिओर या व्हीडिओमध्ये सांगितले की, जेनाचे स्नायू इतके कमकुवत झाले आहेत की, ती स्वतः बाथरूममध्ये देखील जाऊ शकत नाही. लिओर म्हणाला, ‘ती स्वतःहून गेली तर पडते. आता तर मला तिचे पाय धरुन उचलून न्यावं लागतं. तिला स्वतःहून चालता देखील येत नाही.’
भारतातल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी मिया खलिफा कोण आहे?
Guillain-Barre syndrome म्हणजे काय?
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (National Health Service : NHS)) नुसार, हा एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. Guillain-Barrre syndrome ची लक्षणे प्रथम पाय आणि हातांमध्ये दिसतात. हात-पाय सुन्न होणे, खाज येणं, स्नायू कमकुवत होणे, वेदना आणि समतोल समस्या ही या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची मुख्य लक्षणे आहेत.
हे सिंड्रोम रोगप्रतिकारक प्रणालीतील समस्येमुळे झाल्याचे मानले जाते. त्यामुळे शरीर रोग आणि संसर्गाशी लढण्यास सक्षम राहत नाही. साधारणपणे, जेव्हा-जेव्हा जंतू शरीरात प्रवेश करतात तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती त्यावर हल्ला करते. परंतु Guillain-Barrre syndromeच्या बाबतीत असे होत नाही. उलट या सिंड्रोममध्ये शरीराच्या नसा कमकुवत होतात.
ADVERTISEMENT