मुंबईत आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आज खास ट्विट केलं आहे. या ट्विटमधून मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे मुंबई महापालिकेने?
तिमिरातून तेजाकडे नेणारा सूर्य हा नेहमीच जास्त तेजोमय असतो! आणि असाच तेजोमय सूर्य आज मुंबईने अनुभवला. आज मुंबईत शून्य कोव्हिड मृत्यूंची नोंद झाली. आमची आशा आहे की ही संख्या अशीच राहो आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही सुरू राहतील.
आज मुंबईत 238 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर 210 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 45 हजार 200 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत 1797 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 2514 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईचा ग्रोथ रेट 8 ते 14 डिसेंबर या आठवड्यात 0.03 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आज शून्य मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 65 हजार 934 रूग्णांची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 45 हजार 200 कोरोनातून बरे झाले आहेत. आज मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16 हजार 360 कोरोना मृत्यू झाले आहेत.
टेन्शन कायम! महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दिवसभरात आणखी चार रूग्ण
आज ओमिक्रॉन बाधित आढळलेल्या चार रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
हे सर्व प्रयोगशाळा नमुने डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात घेण्यात आलेले आहेत.
या चार रुग्णांपैकी एक स्त्री तर तीन पुरुष
वयोगट-16 वर्षे ते 67 वर्षे
लक्षणे- सर्व रुग्ण लक्षणेविरहित आहेत
प्राथमिक माहितीनुसार उस्मनाबाद य़ेथील एका रुग्णाने शारजा प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण त्याचा निकटसहवासित आहे.
बुलढाणा य़ेथील रुग्णाने दुबई प्रवास केला आहे. मुंबईतील एक व्यक्तीने आयर्लंड प्रवास केला आहे.
या पैकी तीन रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर एक रुग्ण लसीकरणास पात्र नाही
सर्व रुग्ण रुग्णालयात विलगीकरणात आहेत.
या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
ADVERTISEMENT