हिरेन यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टशी छेडछाड – आशिष शेलारांचा आरोप

मुंबई तक

• 09:27 AM • 26 Mar 2021

मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण सध्या गाजतंय, NIA चे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास NIA ला वर्ग करण्यात आला. विरोधीपक्षातील भाजप अजुनही हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सत्ताधारी पक्षात असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करतोय. भाजप आमदार आशिष शेलार […]

Mumbaitak
follow google news

मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण सध्या गाजतंय, NIA चे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र एटीएसकडून हा तपास NIA ला वर्ग करण्यात आला. विरोधीपक्षातील भाजप अजुनही हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सत्ताधारी पक्षात असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करतोय. भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत, हिरेन यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला.

हे वाचलं का?

५ मार्च रोजी मुंब्रा खाडी परिसरात हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. यावेळी हिरेन यांच्या गळ्याभोवती रुमाल आढळले होते. प्राथमिक तपासात हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं…परंतू यानंतर या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. परंतू हिरेन यांच्या गळ्याभोवत रुमाल सापडल्याची बाब पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमुद का नाही असा सवाल शेलार यांनी विचारला. “पोस्टमार्टेम होत असताना त्याचं पूर्णपणे चित्रीकरण करण्यात आलं नाही, त्यावेळी फक्त ७-८ मिनीटांचं चित्रीकरण करण्यात आलं. ज्यामुळे पुरेसे पुरावे मिळू शकले नाहीत. या घटनेचं चित्रीकरण पूर्णपणे का करण्यात आलं नाही याचाही तपास NIA ने करायला हवा. यामागे कोणत्या अधिकाऱ्याचा किंवा मंत्र्यांचा दबाव होता याचाही तपास व्हायला हवा,” असं शेलार म्हणाले.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण जाहीर करण्यात आलं नव्हतं. “ हिरेन यांच्या मृतदेहावर गरज नसातानाही Diatom tests करण्यात आली. मुंबईतील कलीना येथील फॉरेन्सिक लॅबनेही अशा प्रकारे Diatom tests करण्यासाठी परवानगी नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर या प्रकरणातले अहवाल जे.जे.हॉस्पिटलमध्ये मान्यता नसलेल्या लॅबला पाठवण्यात आले. कोणाच्या सांगण्यावरुन हे अहवाल जे.जे. रुग्णालयातील लॅबमध्ये पाठवण्यात आले, असा सवाल शेलार यांनी विचारला. NIA ने जर मला विचारलं तर मी त्या मंत्र्यांचं नाव घेईन असंही शेलार म्हणाले.

मनसुखची हत्या करण्यासाठी आधी क्लोरोफॉर्मचा वापर?

या प्रकरणात आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांची ATS कडून कसून चौकशी सुरु होती. मोबाईल टॉवर आणि आयपी अॅड्रेसच्या माहितीवरुन सचिन वाझे हा मनसुख हिरेनच्या खुनाच्या वेळी गाडीमध्ये उपस्थित होता ज्या गाडीतच मनसुखचा खून करण्यात आला असा ATS ला संशय आहे.

मनसुख हिरेनच्या शवविच्छेदनानुसार त्याच्या चेहऱ्यावर ओरखडे आढळले आहेत. हे ओरखडे चेहऱ्याच्या डाव्या बाजूवर आणि डाव्या नाकपुडीच्यावर आढळले होते. तसेच उजव्या गालाच्यावर आणि डोळ्याच्या जवळ देखील ओरखड्य़ाच्या खुणा होत्या. तसेच या साऱ्या खुणा या मृत्यूच्या आधी झाल्या होत्या. मात्र, शरीरातील इतर अवयवांना मात्र इजा झाली नव्हती.

मनसुख हिरेन हत्येप्रकरणात वाझे मुख्य आरोपी, एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचाही हात: ATS

ATS च्या माहितीनुसार जेव्हा क्लोरोफॉर्मचा वापर करण्यात आला तेव्हा मनसुख हिरेनने प्रतिकार केल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हे ओरखडे आले असण्याची शक्यता आहे. क्लोरोफॉर्मचा वापर केल्यानंतर काही मिनिटातच मनसुख बेशुध्द झाला आणि नंतर त्याचा श्वास कोंडून खून करण्यात आला.

मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनसुख हिरेनचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा मनसुखच्या मास्क मागे 5 हातरुमाल गुंडाळलेले सापडले होते. हे रुमाल मनसुखच्या तोंडात कोंबलेले नव्हते ते फक्त मास्कच्या मागे गुंडाळलेले होते.

ATS चा असा संशय आहे की याच हातरुमालांचा वापर करुन मनसुखवर क्लोरोफॉर्मचा वापर केलेला असावा. पण याचा फॉरेन्सिक रिपोर्ट अदयाप बाकी आहे.

‘मुंबई पोलिसांपासून सचिन वाझेंना सुरक्षित ठेवा नाहीतर, त्यांचाही मनसुख हिरेन होऊ शकतो’

मनसुखच्या हत्येवेळी सचिन वाझे घटनास्थळी हजर होता?

ATS ने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आता मनसुखच्या हत्येवेळी वाझे हा घटनास्थळी होता का या शक्यतेचा तपास सुरु आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते वाझे हा घटनास्थळीच उपस्थित होता. ATS ने जे सिमकार्ड गुजरात मधून जप्त केले त्याच सिमकार्डचा वापर वाझे करत होता अशी माहिती अटक झालेल्या विनायक शिंदेने ATS अधिकाऱ्यांना तपासादरम्यान दिली.

पाहा ATSच्या तपासानुसार कसा आहे मनसुखच्या हत्येचा नेमका घटनाक्रम

ATSच्या माहितीनुसार वाझेच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन हे क्राईम ब्रँच किंवा क्रॉफर्ड मार्केटची जागा दाखवत होते. वाझे त्या दिवशी रात्री 11 वाजता क्राईम ब्रँचला पोचले आणि नंतर डोंगरी भागातल्या टिप्सी बारवर छापा मारला. दुसरीकडे याचसंबंधी महत्त्वाची बाब म्हणजे एटीएसच्या अटकेतील आरोपी विनायक शिंदे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डायरीमध्ये 35 बारची यादी सापडली आहे. याच बारमधून शिंदे हा वाझेंसाठी हप्ता गोळा करत असल्याचंही तपासात समोर आलं आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात पोस्ट मार्टम पूर्ण, ठाणे पोलीस म्हणतात…

  • 4 मार्चला वाझेने संध्याकाळी 7 वाजता त्याचे ऑफिस सोडले आणि रात्री 8.30 वाजता वाझे ठाण्याला पोचला.

  • इथून मनसुखला फोन करुन बोलवण्यात आले आणि बायकोला कोणी तावडे नावाच्या व्यक्तीने कॉल केला असे सांग. असं बजावलं. (कारण मनसुख वाझेला भेटतो यावरुन मनसुखचे घरचे नाराज होते. कारण वाझे मनसुखला अटक करुन घे असे सांगत होता. ही माहिती मनसुखच्या घरच्यांनी स्टेटमेंटमध्ये नोंदवली आहे.)

  • वाझे मनसुखला 3-4 माणसांबरोबर भेटला आणि गाडीतच मनसुखच्या तोंडावर रुमाल लावून खून करण्यात आला. नंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकण्यात आला.

  • ATS ला असाही संशय आहे की मनसुखच्या हत्येनंतर आरोपींना मनसुखचा फोन चालू ठेवला आणि त्यावर वसईचे लोकेशन येईल याची काळजी घेतली. जेणेकरुन तपासात गडबड होईल. असा त्यांचा अंदाज होता.

    follow whatsapp