दोन-तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उरुनही उर्जा राज्यमंत्री म्हणतात, लोडशेडिंगमधून सुटका होईल!

मुंबई तक

• 04:12 PM • 15 Apr 2022

सध्या संपूर्ण राज्यावर लोडशेडिंगचं संकट घोंगावत आहे. कोळशाचा साठा पुढचे काही दिवस पुरेल इतकाच असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भारनियमनाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 19 तारखेपर्यंत पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे तरीही उर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे हे लोडशेडिंग न करण्याबाबत आशावादी आहेत. जळगाव येथील कार्यक्रमात बोलत असताना तनपूरे यांनी येत्या एक-दोन दिवसांत भारनियमनातून सुटका […]

Mumbaitak
follow google news

सध्या संपूर्ण राज्यावर लोडशेडिंगचं संकट घोंगावत आहे. कोळशाचा साठा पुढचे काही दिवस पुरेल इतकाच असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भारनियमनाला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 19 तारखेपर्यंत पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे तरीही उर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे हे लोडशेडिंग न करण्याबाबत आशावादी आहेत.

हे वाचलं का?

जळगाव येथील कार्यक्रमात बोलत असताना तनपूरे यांनी येत्या एक-दोन दिवसांत भारनियमनातून सुटका होईल असं तनपुरे यांनी सांगितलं आहे.

“भारनियमनाची समस्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात उद्भवली आहे. मात्र यावर वेगवेगळ्या उपाययोजना करत राज्यातील जनतेची सुटका करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. इतर राजांकडून वीज खरेदी करून एक ते दोन दिवसात लवकरच महाराष्ट्र राज्य भारनियमन मुक्त होईल”, असा आशावाद राज्याचे ऊर्जामंत्री राज्यात तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.

सद्यस्थितीत राज्यात दोन ते तीन दिवस विजेसाठी पुरेल एवढाच कोळसा आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की नवीन स्टॉक येत नाही. नवीन स्टॉक हा येत असतो त्यानुसार पुढील निर्णय आम्ही घेऊ असं स्पष्टीकरण ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलं आहे. याचवेळी बोलत असताना तनपुरे यांनी भाजपवरही निशाणा साधला.

गेल्या काळात भाजप सरकारने शेतकऱ्यांकडून वसूली ही केली नाही आणि त्यांना कुठली पद्धतीने दिलासाही दिला नाही. महावितरणकडे दुर्लक्ष केल्याने महावितरण वर मोठा बोजा पडला. महावितरणची सर्व बाजूने आर्थिक नाकेबंदी हे फक्त गतकाळातील भाजपसरकार मुळेच झाली आहे. सहकार्य करायचे नाही आणि महावितरण च्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारला लोकांसमोर बदनाम करायचं व महावितरण तोट्यात असल्याचा दाखवायचा यामुळे महावितरण खाजगीकरण करण्याचा तर विचार केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोपही यावेळी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला.

    follow whatsapp