–रोहित हातांगळे, बीड
ADVERTISEMENT
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना घेऊन शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीला गेले होते. ती भेट ईडीने वक्रदृष्टी करू नये म्हणून होती. संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर शरद पवार शांत आहेत तर अजित पवार मोघम प्रतिक्रिया देत आहेत, छगन भुजबळ यांनी तर सांगितले आहे ईडीच्या केसमध्ये जामीन होत नाही असे प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे ट्विट, शरद पवार गप्प?
संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी अटक केली. 8 ऑगस्टपर्यंत त्यांनाा ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी ईडी करणार आहे. संजय राऊतांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे. संजय राऊत यांना समर्थन दिले आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी फोनकरुन चौकशी केल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे. परंतु शरद पवारांनी माध्यमांसमोर जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादी गप्प का असा प्रश्न विचारला जात आहे.
राज ठाकरेंनी जाहीर भाषणात दिले होते ‘हे’ संकेत
१२ एप्रिल २०२२ ला झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. ” मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाच्या वेळी बोललो होतो, शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते. शरद पवार हल्ली संजय राऊत यांच्यावर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही.”
१२ मार्चला राज ठाकरेंना संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारली होती, त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की “संजय राऊत यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे”.
संजय राऊतांनी पत्र लिहून मानले आभार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या पत्रात यावर जोर दिला आहे, की कठीण प्रसंगातच हे कळतं की आपला खरा मित्र कोण आहे? आपले शुभचिंतक, हितचिंतक कोण हे अशाच प्रसंगांमध्ये कळतं असाही उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. आपल्या पत्रात संजय राऊत यांनी केंद्र सरकारने माझ्या विरोधात राजकीय कट रचल्याचा आरोपही केला आहे. मात्र मी झुकणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ही माझी लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही हेदेखील संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
पत्रात संजय राऊत म्हणतात, वेळ आल्यावर आमचाच विजय होणार आहे. आमच्या विचारांचा विजय होणार आहे. त्यांनी हेदेखील म्हटलं आहे की मला ठाऊक आहे आत्ता गोष्टींना धीराने सामोरं जाण्याची गरज आहे. आमच्या विचारांचा विजय झाल्यानंतरच या देशाला योग्य दिशा मिळेल.
ADVERTISEMENT