भाजपला शिवसेनेसह सगळेच प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला. याचं कारण होतं जे. पी. नड्डा यांनी केलेलं एक वक्तव्य. मात्र भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एक भाष्य शिवसेनेबाबत केलं होतं. राजदीप सरदेसाई आणि प्रकाश अकोलकर यांनी मुंबई तकशी बोलताना यांनी ही आठवण सांगितली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले होते जे. पी. नड्डा?
सगळे लोक संपले आहेत. मिटले आहेत. जे नाही संपले, ते संपून जातील. फक्त भाजप राहिल. एका विचारामुळे आपण लढत आहोत. विचारांमुळे जोडले गेलेलो आहोत. कार्यकर्त्यांचा बेस बनतो तो पक्ष कार्यालयात असं वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. यानंतर भाजपला शिवसेना संपवायची आहे असा आरोप यांनी केला. याबाबत मुंबई तकच्या आजचा मुद्दा कार्यक्रमात प्रकाश अकोलकर आणि राजदीप सरदेसाई यांनी प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण सांगितली.
काय म्हणाले होते प्रमोद महाजन शिवसेनेबाबत?
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजप हा राज्यात क्रमांक १ चा पक्ष होईल. तसंच शिवसेना कमकुवत होईल असं वक्तव्य प्रमोद महाजन यांनी केलं होतं. प्रकाश अकोलकर आणि राजदीप सरदेसाई या दोघांनीही ही आठवण सांगितली. मागच्या आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. जिथे त्यांचा प्रतिस्पर्धी काँग्रेस आहे तिथे भाजपचं वर्चस्व आहे.
बंगालमध्ये जी निवडणूक पार पडली त्यात ममता बॅनर्जी रिजनल कार्ड खेळल्या. मोदी आणि शाह हे बाहेरचे आहेत हे दाखवण्यात ममता यशस्वी झाल्या आणि निवडणूक जिंकल्या. तर दुसरीकडे केरळमध्येही असंच चित्र पाहण्यास मिळालं. जिथे प्रादेशिक भावना कट्टर आहेत तिथे भाजप बाहेरचा आहे हे पक्षांना दाखवणं सोपं असतं असं राजदीप सरदेसाईंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राबाबत आणि शिवसेनेबाबत काय म्हणाले राजदीप सरदेसाई?
“महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर रिजनल सेंटिमेंटचं राजकारण आहे त्यात काहीसा कमकुवतपणा आला आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांना तामिळनाडूसारख्या नेत्यांप्रमाणे यश मिळालं नाही. शिवसेनेला गेल्याच इलेक्शनमध्ये भाजपने मागे ठेवलं होतं. भाजपला हे वाटतं आहे की आम्ही उद्धवसेनेला लक्ष्य केलं आणि आम्ही पारिवारीक पार्टी नाही हे भाजपला दाखवायचं आहे. एकनाथ शिंदे यांचा रोल कळत नाही पण तो एकच असावा की तुम्हीपण आमची मदत करा उद्धवसेना संपवायला.”
मला एक चांगली आठवण आहे की प्रमोद महाजन यांनी सांगितलं होतं २० वर्षांपूर्वी ते बोलले होते की भाजप एक काळ असा येईल की सर्वात मोठा पक्ष होणार. शिवसेना कमकुवत झाली तर त्याचा आम्हाला फायदा होईल हे प्रमोद महाजन २० वर्षांपूर्वी बोलले होते अशी आठवणही राजदीप सरदेसाई यांनी सांगितली. पुढच्या दोन वर्षात उद्धवसेना संपवायची हे भाजपचं लक्ष्य असू शकतं. जिथे रिजनल सेंटिमेंट स्ट्राँग आहेत तिथे भाजपला टक्कर देऊ शकतात. तेलंगणमध्येही कुणीतरी एकनाथ शिंदे सापडतीलच असंही राजदीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT