एकत्र बसून चहा पिणं म्हणजे विरोधी पक्षांची एकजुट नाही असा टोला नितीश कुमारांना प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लगावला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौरे करून अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. याबाबत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला. आज तकसोबत केलेल्या खास चर्चेत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणाबाबत?
ज्येष्ठ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत हे खास वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर प्रशांत किशोर यांनी असंही म्हटलं आहे की नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून महाआघाडीमध्ये जाणं ही राज्याच्या राजकाणावर आधारलेली घटना आहे. या घटनेचा विशेष परिणाम इतर राज्यांवर होणार नाही.
प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?; सोनिया गांधींना सांगितला ‘मिशन २०२४’चा प्लान
महाराष्ट्राच्या राजकणाबाबत काय म्हणाले प्रशांत किशोर?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. मात्र ते सरकार गेलं आणि आता तिथे एनडीएचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही बदल झाला आहे त्याचा जसा परिणाम बिहारच्या राजकारणावर झाला नाही तसाच बिहारचा परिणाम हा राज्यापुरता मर्यादित आहे असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
२०१५ मध्ये महागठबंधनला जनतेने जनमत दिलं होतं. मात्र आज जे घडलं आहे ते जनमत नाही. पडद्याच्या मागून आलेलं सरकार आलं आहे. तसंच असं काही बिहारमध्ये घडलं म्हणजे असा फॉर्म्यूला देशात लागू होईल असं नाही असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला दिलेल्या लीडरशीपच्या फॉर्म्युलात ना राहुल गांधी होते ना प्रियंका गांधी-प्रशांत किशोर
खुर्ची आणि नितीशकुमार यांचं नातं तुटणार नाही
राजकीय रणनीतीकार यांनी असं म्हटलं आहे की नितीश कुमार यांनी जी राजकीय समज दाखवत आपलं मुख्यमंत्रीपद कायम ठेवलं आहे त्यात त्यांचं कौशल्य दिसून येतं आहे. त्यामुळे खुर्ची आणि नितीश कुमार यांचं नातं काही तुटणार नाही असंही फ्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमार यांच्याबाबत काय म्हणाले प्रशांत किशोर?
नितीश कुमार कालपर्यंत भाजपमध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यासाठी महामानव होते. त्यांना ९० अंशात झुकून नमस्कार करत होते. आपल्या कार्यकाळात सर्वाधिक काळ नितीश कुमार भाजपसोबत होते. आता नितीश कुमार विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. भेटीगाठी घेत आहेत, आता भाजप सोडून गेल्यानंतर नितीश कुमार विरोधक म्हणून कसं काम करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांनी जी अरविंद केजरीवाल आणि केसीआर यांच्यासोबत भेट घेतली त्याबाबतही भाष्य केलं आहे. राष्ट्रीय राजकारणात सगळे पक्ष एकत्र आले तरीही त्यांना एक चेहरा लागेल. तो चेहरा जोपर्यंत समोर येत नाही आणि तो लोकांना विश्वासार्ह वाटत नाही तोपर्यंत कुठल्याही भेटी घेऊन आणि सोबत चहा पिऊन काही होणार नाही. असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT