विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माफीची मागणी केल्यानंतर आता सुरेखा पुणेकर यांनीही दरेकरांवर निशाणा साधला आहे. ‘प्रवीण दरेकरांच्या तोंडात महिलांविषयी अपशब्द आले, मला खूप वाईट वाटलं. त्यांच्या पक्षाला हे शोभत नाही’, असं म्हणत पुणेकरांनी खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
सुरेखा पुणेकर या 16 तारखेला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील शिरुरमध्ये रविवारी ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणार पक्ष आहे’, असं विधान केलं होतं. प्रवीण दरेकरांनी केलेल्या विधानावरून लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांनी दरेकर यांना सुनावलं आहे.
“प्रविण दरेकरजी, माफी मागा… अन्यथा गाल आणि थोबाडही रंगवू शकतो”
‘प्रवीण दरेकरांच्या तोंडात महिलांविषयी अपशब्द आले. मला खूप वाईट वाटलं. त्यांच्या पक्षाला हे शोभत नाही. बर असो’, असं म्हणत पुणेकर म्हणाल्या, ‘पक्ष कोणताही असुद्यात तुम्ही आठ दिवसांपासून महिलांवर अत्याचार होतोय. अमुक होतंय, तमुक होतंय अस सर्वत्र बोलताय आणि मग तुम्ही एवढे मोठे विरोधी पक्षनेते असताना तुम्ही महिलांच्या विषयी अपशब्द का बोललात? हे चुकीचा आहे. मग आता वाघ मॅडम का गप्प बसल्या?’, असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी केला आहे.
‘दरेकर यांनी असा अपशब्द वापरला. गालावरची लाली हा घाणेरडा शब्द त्यांच्या तोंडात आला कसा? आणि महिलांचा तुम्हाला आदर नाही करता येत तर तुम्ही महिलांविषयी अपशब्द बोलू तरी नका ना. तुमच्याकडे तुमच्या घरांमध्ये महिला नाहीयेत का? आपण महाराष्ट्राची शान लोककला सातासमुद्रापार नेली आणि आज ही कला महिलांपर्यंत पोहोचवली आज महिला लावणीसाठी वेड्या आहेत आणि आता तुम्हाला लाली, गाणं आठवायला लागले का?’, असा प्रश्न सुरेखा पुणेकर यांनी दरेकर यांना केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष – प्रवीण दरेकरांची सरकारविरुद्ध चौफेर टोलेबाजी
दरेकर चुकीचे बोलले आहेत. महिलांविषयी अपशब्द बोलू नका ती कोणतीही महिला असू द्या. कलाकार असू द्या, गृहिणी असू द्या, वेश्या असुद्या कुणीही असुद्या. तुम्हाला अधिकार कुणी दिला, महिलांविषयी नाव ठेवायचा? तुमचा पक्ष एवढा मोठा आहे आणि पक्षातला माणूस महिलांना नाव ठेवतोय हे किती वाईट. हा शब्द तुम्ही मागे घ्या. दरेकर साहेब तुम्ही चुकीचं बोललात. तुम्ही कुणाच्याच विषयी बोलू नका. महिलांविषयक बिलकुल बोलू नका. तुम्ही पुरुषांबद्दल बोला ना. महिलांविषयक का बोलता?’, असंही सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT