हरियाणाचा २३ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. टोकियोमध्ये नीरजच्या रुपाने भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालं. अभिनव बिंद्राने २००८ साली भारताला नेमबाजीत पहिलं गोल्ड मेडलं मिळवून दिलं त्यानंतर १३ वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये आणखी एका सुवर्णपदक मिळालं. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
ADVERTISEMENT
नीरज चोप्रा मुळचा हरियाणातल्या पानीपत गावचा. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्राला सहा कोटींचं बक्षीस, सरकारी नोकरी आणि ट्रेनिंगसाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचं आश्वासन दिलं आहे. याव्यतिरीक्त इतर राज्यांची सरकार आणि क्रीडा संघटनांनीही नीरजवर बक्षीसांचा वर्षाव केला आहे. जाणून घ्या नीरजला आतापर्यंत जाहीर झालेल्या बक्षीसांची यादी…
लठ गाड़ दिया छोरे ! Tokyo Olympics गाजवणाऱ्या नीरज चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव
१) हरियाणा सरकार – ६ कोटी
२) पंजाब सरकार – २ कोटी
३) केंद्र सरकार – ७५ लाख
४) मणीपूर सरकार – १ कोटी
५) बीसीसीआय – १ कोटी
६) चेन्नई सुपरकिंग्ज – १ कोटी
Tokyo Olympics : ना सोशल मीडिया, ना फोन हातात घेतला…वाचा Neeraj ने कसं केलं स्वतःला तयार?
नीरज चोप्राने भारताला अखेरच्या दिवशी सुवर्णपदकाची कमाई करुन देत सातवं पदक मिळवून दिलं. टोकियोत भारताची कामगिरी १ सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्य मिळून ७ पदकं अशी राहिलेली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासातली भारताची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. जर्मनी, चेक रिपब्लीक, पाकिस्तान यांचं कडवं आव्हान मोडून काढत नीरजने ८७.५८ मी. लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
टोकियोत ऐतिहासीक कामगिरी करणारा नीरज चोप्रा हा रोड मराठा समाजाचा आहे. पानीपतच्या युद्धानंतर जे मराठा सैनिक आणि लोकं हरियाणातचं थांबले तो समाज हरियाणात रोड मराठा समाज म्हणून ओळखला जातो.
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर मुंबई तक ने हरियाणातले रोड मराठा समाजाचे नेते विरेंद्रसिंग यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना विरेंद्र यांनी नीरज चोप्राच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. “नीरज चोप्राने आज टोकियोत सुवर्णपदक मिळवलं. संपूर्ण रोड मराठा समाज नीरजच्या कामगिरीवर खुश आहे. इथे आता उत्साहाचं वातावरण आहे. हरियाणा आणि संपूर्ण देशाला नीरजचा अभिमान आहे. हरियाणातला रोड मराठा समाज अजूनही आपल्या मुळांशी जोडला गेला आहे. रोड मराठा समाजातली मुलं आपापल्या क्षेत्रात नाव गाजवत आहेत, येणाऱ्या काळातही ही मुलं अशीच कामगिरीत करतील अशी आम्हाला आशा आहे. सरकारने या मुलांना प्रोत्साहन द्यावं, जेणेकरुन ते देशाचं नाव उज्वल करतील.”
ADVERTISEMENT