अमूल आणि मदर डेरी या दोन्ही ब्रांड्सनी त्यांच्या दुधाचे दर वाढवले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. या दोन्ही कंपन्यांनी प्रति लिटर दरांमध्ये दोन रूपयांची वाढ केली आहे. १७ ऑगस्ट पासून या दोन्ही कंपन्यांच्या दुधाचे दर वाढले आहेत. १७ ऑगस्ट २०२२ पासून या दोन्ही कंपन्यांचं दूध महागलं आहे.
ADVERTISEMENT
गुजरात, दिल्ली, एनसीआर, पश्चिम बंगाल, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी अमूल आणि मदर डेअरी या कंपन्यांचं दूध मिळतं जे आता दोन रूपये जादा देऊन घ्यावं लागणार आहे कारण दोन्ही कंपन्यांची दुधामागे प्रति लिटर २ रूपयांची वाढ केली आहे.
अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही कंपन्यांचं दूध दोन रूपये प्रति लिटर महाग
गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या किंमीत प्रति लिटर २ रूपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे मदर डेअरी या कंपनीचं दूधही महागलं आहे. नव्या किंमती १७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
नव्या किंमतींनुसार अमूल गोल्ड अर्धा लिटर दूध ३० ऐवजी ३१ रूपयांना मिळणार आहे. तर अमूल गोल्ड १२ हे दूध ५९ ऐवजी ६१ रूपये प्रति लिटर मिळणार आहे. अमूल ताजा हे दूध २५ ऐवजी २६ रूपयांना अर्धा लिटर मिळणार आहे तर अमूल ताजाचं १ लिटरचं पाकिट ४९ ऐवजी ५१ रूपयांना मिळणार आहे. अमूल ताजाचं ६ लिटरचं पाकिट ३०० ऐवजी ३१२ रूपयांना मिळणार आहे. तर अमूल ताजाचं दोन लिटरचा पॅक ९६ ऐवजी १०० रूपयांना मिळणार आहे.
अमूल आणि मदर डेअरी दुधाचे दर वाढल्याने सामान्यांच्या खिशाला फटका
अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही दुधाची किंमत वाढल्याने गुजरात, अहमदाबाद, सौराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान या सगळ्या ठिकाणी दुधाचे दर वाढले आहेत. अमूलची उत्पादनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकली जातात. या ठिकाणी आता दूध दरवाढीचा सामना ग्राहकांना करावा लागणार आहे.
अमूल दुधाचे दर वाढल्याची घोषणा केली जाताच काही वेळातच मदर डेअरी या प्रसिद्ध कंपनीनेही त्यांच्या दरांमध्ये वाढ केली आहे. नव्या दरांची घोषणा झाल्यानंतर अमूल गोल्ड, अमूल ताजा, अमूल शक्ती या सगळ्या दुधाच्या किंमतीत प्रति लिटर २ रूपयांची वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT