रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या पत्रकार बाळ बोठेला शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. ३० नोव्हेंबर २०२० च्या रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची हत्या झाली होती. यानंतर गेल्या ५-६ महिन्यांपासून पोलिसांची सहा पथकं बाळ बोठेच्या मागावर होती. बाळ बोठे नगर पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला याबद्दलची महत्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार झाल्यापासून बाळ बोठे हा एका गुन्हेगाराच्या मोबाईलवरुन हॉटेल व्यवसायिक महेश तनपुरे आणि आणि हैदराबाद येथील वकील जनार्दन चंद्रप्पा यांच्याशी संपर्कात होता. याच फोनवरुन बोठे आणि त्याची पत्नी संभाषण करायचे. या क्रमांकावर पाळत ठेवल्यानंतर बाळ बोठेचा ठावठिकाणा पोलिसांना माहिती झाला.
ADVERTISEMENT
गुन्हेगाराच्या मोबाईलवरुन नगरमध्ये संभाषण केलं जात असल्याची माहिती नगर पोलिसांच्या सायबर सेलला मिळाली होती. गेल्या दीड महिन्यापासून पोलीस बोठेच्या मागावर होते. फरार झाल्यापासून बोठे महेश तनपुरे यांच्याशी संपर्कात होता. याच मोबाईलवरुन बोठे आणि त्याची पत्नी संपर्कात असायचे. नगरमध्ये सध्या काय घडामोडी घडतायत आणि पुढे काय करायचं याबद्दलचं मार्गदर्शनही बोठे याच गुन्हेगाराच्या मोबाईलवरुन पत्नीला करत होता.
रेखा जरे हत्या : मुख्य सूत्रधार बाळ बोठेला हैदराबादमध्ये अटक
हैदराबादमध्ये बोठे पी अँड टी कॉलनीत लपून बसला होता. बाळ बोठेला लपून बसण्यासाठी राजशेखर चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रेहमान या व्यक्ती मदत करत होत्या. तर महेश तनपुरे बाळ बोठेशी संपर्कात राहून त्याला नगरमधल्या घडामोडींविषयी माहिती देत होता. सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केलं…ज्यात सर्व आरोपींना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT