ADVERTISEMENT
प्रियंका चोप्राने नव्या मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.
अलिकडेच प्रियांकाला तिच्या शरीरावरून कसं हीनवण्यात आलं आणि त्यावेळी काय वाटलं हे तिने शेअर केलं.
प्रियांका नुकतीच, SXSW 2023 फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली. तिथे तिने अॅमेझॉन स्टुडिओच्या प्रमुख जेनिफर सालक यांच्याशी संवाद साधला.
यावेळी प्रियांका म्हणाली, ‘मला अशा अनेक गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं ज्या ऐकणं खूप कठीण आहे.’
‘ते ऐकताना मला खूप वाईट वाटलं कारण कालच मला कोणीतरी म्हणालं की मी सॅम्पल साइज नाहीये.’
पुढे प्रियांका म्हणाली, ‘मला याचा त्रास झाला आणि मी हे माझ्या कुटुंबियांना सांगितलं. नंतर मी माझ्या पती आणि टीमसमोर रडले.’
‘मला खूप वाईट वाटत होतं की मी सॅम्पल साईझ नाही आणि इतरांच्या मते ही समस्या आहे. पण आपल्यापैकी बरेच जण परफेक्ट आकाराचे नाहीत.’
यापूर्वीही प्रियांकाने सांगितलं होतं की, एकेकाळी तिला काळी मांजर आणि डस्की देखील म्हटलं जायचं. याचा तिला राग यायचा.
ADVERTISEMENT