नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (21 मार्च) पद्म पुरस्कार (Padma Shri Awards)प्राप्त लोकांना राजधानी दिल्लीत सन्मानित केलं. यावेळी एका पद्म पुरस्कार विजेत्याची सध्या सर्वत्रच चर्चा सुरु आहे. वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद (Swami Sivananda)पद्मश्री यांनी पुरस्कार सोहळ्यात जी कृती केली त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. देशातील अत्यंत मानाच पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद हे चक्क अनवाणी पोहोचले होते.
ADVERTISEMENT
पद्म पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी स्वामी शिवानंद हे पंतप्रधान मोदींसमोर नतमस्तक झाले. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी गुडघे टेकून पंतप्रधान मोदींना अभिवादन केले. शिवानंद यांचे हे भाव पाहून पीएम मोदीही आपल्या खुर्चीवरून उठले आणि शिवानंद यांच्यासमोर नतमस्तक झाले.
पंतप्रधान मोदींना अभिवादन केल्यानंतर स्वामी शिवानंद यांनी पद्म पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोरही गुडघे टेकले. स्वामी शिवानंदांना आपल्यासमोर नतमस्तक झालेले पाहून राष्ट्रपती कोविंद पुढे आले आणि त्यांनी त्यांना स्वत: हाताला धरुन उभं केलं.
स्वामी शिवानंद यांचे हे नम्रतापूर्ण भाव अनेकांच्या हृदयाला स्पर्श करुन गेला. त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना एका IAS अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘126 वर्षीय योगगुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्याची घोषणा. योगासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे स्वामी शिवानंद हे आपल्या नम्र व्यक्तिमत्त्वाने सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. योगाची उत्पत्ती जिथून झाली तेथूनचा आम्ही आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.’
126 वर्षांचे आहेत स्वामी शिवानंद
स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धती आणि योग क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 126 व्या वर्षीही स्वामी शिवानंद किशोरवयीन मुलासारखे तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. स्वामी शिवानंद यांचे जीवन हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. स्वामी शिवानंद यांच्या पासपोर्टनुसार त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी झाला होता.
पद्म पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य आणि संध्या मुखर्जी आहेत तरी कोण?
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण 128 जणांचा समावेश आहे. यापैकी चार जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT