पुणे : चांदणी चौकातला उड्डाणपूल अखेर इतिहासजमा! अवघ्या काही सेकंदात पूल जमीनदोस्त

मुंबई तक

• 08:00 PM • 01 Oct 2022

मागच्या तीन दशकांपासून चर्चेत असलेला पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला. सुमारे ३० वर्षांपूर्वीचा हा पूल इतिहासजमा झाला आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. या ठिकाणी जमा झालेला ढिगारा दूर करण्याचं काम आता युद्ध पातळीरवर सुरू करण्यात आलं आहे. चांदणी चौकातल्या उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. […]

Mumbaitak
follow google news

मागच्या तीन दशकांपासून चर्चेत असलेला पुण्यातल्या चांदणी चौकातला पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आला. सुमारे ३० वर्षांपूर्वीचा हा पूल इतिहासजमा झाला आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. या ठिकाणी जमा झालेला ढिगारा दूर करण्याचं काम आता युद्ध पातळीरवर सुरू करण्यात आलं आहे. चांदणी चौकातल्या उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

हे वाचलं का?

चांदणी चौकातला पूल पाडण्यासाठी संध्याकाळपासून तयारी

चांदणी चौकातला हा पूल पाडण्यासाठी संध्याकाळपासून तयारी सुरू झाली होती. चांदणी चौकातल्या पुलाला पांढऱ्या कपड्याने झाकण्यात आलं होतं. धुरळा उडू नये आणि कुणाला काही इजा होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली होती. ज्या कंपनीने नोएडातले ट्विट टॉवर जमीनदोस्त केले त्याच इडिफिस कंपनीला पूल पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल पाडण्यात आला.

पूल पाडण्यासाठी ६०० किलो स्फोटकं

पूल पाडण्यासाठी ६०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला तसंच १३०० हून अधिक डिटोनेटर्सही वापरण्यात आली. चांदणी चौकात पूल पाडण्याच्या आधीपासून हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता. रस्त्यावर कुणीही माणूस असणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. तसंच या भागात रात्री ११ ते सकाळी ८ या कालावधीत कलम १४४ म्हणजेच जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. पूल पाडत असताना २५० ते ३०० पोलीस, अग्निशमन दलाची वाहनं, रूग्णवाहिका अशी सगळी जय्यत तयारी करण्यात आली होती.

पूल पाडताना वाहतुकीची खबरदारी कशी घेतली गेली?

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात आली.

साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली.

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी.

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी.

    follow whatsapp