पुणे: महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

मुंबई तक

• 12:06 PM • 26 Nov 2021

पुणे: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ अपलोड करुन महिला कर्मचाऱ्याची बदनामी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस विभागात मात्री एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक सामान्य नागरिक विशेषत: महिला अशा प्रकाराला बळी पडल्याचं आपण ऐकलं […]

Mumbaitak
follow google news

पुणे: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ अपलोड करुन महिला कर्मचाऱ्याची बदनामी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पोलीस विभागात मात्री एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक सामान्य नागरिक विशेषत: महिला अशा प्रकाराला बळी पडल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र, आता थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीच असा प्रकार घडत असल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, आता याप्रकरणी महिला कर्मचाऱ्याची बदनामी करणाऱ्या आरोपी विरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या क्राईम निरीक्षक अनिता हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याराने याप्रकरणी तक्रार नोंदवली आह. तक्रारीनुसार तक्रारदार महिलेच्या नावाने दोन बनावट अकाउंट सोशल मीडियावर तयार करण्यात आले होते.

याच सोशल मीडिया अकाउंटमध्ये असं म्हटलं होतं की, ‘पोलीस मी माझ्या नवर्‍याला सोडून दिले आहे’. अटीट्यूड गर्ल, माय लाईफ, माय चॉईस, माय मिस्टेक, बिलिव्ह इन माय सेल्फ’ असे लिहून फिर्यादी महिला कर्मचाऱ्याच्या अकाउंटवर मजकूर पोस्ट करण्यात आला. तसेच तो मजकूर देखील व्हायरल करण्यात आला. याशिवाय त्यावर अश्लील व्हीडिओ देखील पोस्ट करण्यात आला होता.

दरम्यान, ही घटना समोर येताच फिर्यादी महिला पोलीस कर्मचार्‍यांनी तक्रार देताच याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखस होताच आता पुणे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सुरक्षा रक्षकाचं कृत्य! अंघोळ करणाऱ्या महिलेचे खिडकीतून काढले फोटो, व्हिडीओ

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पुण्यातच शासकीय निवासस्थानामधील एक सुरक्षारक्षक हा एका महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो काढत असल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी सुरक्ष रक्षकाला अटकही करण्यात आली आहे.

पुणे स्टेशन परिसरात असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्टेशनजवळ असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये एक महिला आंघोळ करत होती. यावेळी सुरक्षारक्षकाने फोटो काढले. या प्रकरणी आरोपी सुरक्षारक्षकास अटक करण्यात आली आहे.

अशोक तुकाराम चव्हाण (वय 26) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाचं नाव आहे.

मुंबईतील तरुणी WhatsApp Video कॉलवर व्हायची निर्वस्त्र, अनेक तरुणांना ‘असं’ करायची ब्लॅकमेल

या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली. पुणे स्टेशनजवळ असलेल्या शासकीय निवासस्थानामधील बाथरुमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास 26 वर्षीय महिला आंघोळ करीत होती. त्याचवेळी बाथरूममधील खिडकीच्या बाहेरील बाजूला आरोपी अशोक चव्हाण उभा होता.

अंघोळ करणाऱ्या महिलेचे आरोपीने फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. खिडकीच्या बाहेर कुणीतरी असल्याचं महिलेला हालचालीवरून जाणवलं. महिलेनं बघितलं असता तिला खिडकीच्या जवळ एक व्यक्ती दिसून आली. त्यानंतर महिलेनं आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून आसपास असलेल्या नागरिक धावले आणि त्यांनी आरोपीला पकडलं. त्यानंतर संबंधित महिलेनं पोलिसांत तक्रार दिली.

    follow whatsapp