पुणे जिल्ह्यात धक्कादायक आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडलीये. पुणे शहरात एकीकडे कोयता गँगचा हैदोस सुरू असताना आता मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. नशीब बलवत्तर म्हणून थिगळे या घटनेत थोडक्यात बचावले.
ADVERTISEMENT
पुणे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री (21 जानेवारी) गोळीबार करण्यात आला. राजगुरूनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोरच हा धक्कादायक प्रकार घडला.
Pune Crime : बंदुकीचा धाक अन् महिलेला खाऊ घातली स्मशानातील हाडांची पावडर
“मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय. संपवतोच तुला”, असं म्हणत पिस्तुल रोखुन एकाने पैशाची मागणी करत समीर थिगळे यांना धमकी दिली.
मोक्का आणि खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपींकडून खंडणीची मागणी करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला. आरोपीने समीर थिगळे यांच्यावर पिस्तुल रोखत फायरिंग केली. मात्र, नशीब बलवत्तर होत म्हणून छातीवर फायरिंग वेळी पिस्तुल न चालण्याने अनर्थ टळला.
हे नवी मुंबईत घडलंय! मामाच्या मुलासोबत संबंध; लग्नाआधीच आई, नंतर नवजात बाळाला…
त्यानंतर दुसरा राऊंड हवेत फायर झाला. समीर थिगळे यांना आरोपींनी पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार केला. या प्रकरणी राजगुरुनगर पोलिसांनी मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करुन पैसे मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार आहेत.
ADVERTISEMENT