पुणे: एका मॅट्रिमोनी वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने एका तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पुण्यासारख्या शहरात घडली आहे.
ADVERTISEMENT
‘मी सैन्य दलात असून आपण लवकरच लग्न करु,’ असं आरोपी तरुणाने तरुणीला सांगितलं आणि विश्वास संपादन केला. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर तरुणाने तिचे लैंगिक शोषण करणं सुरु केलं.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला अहमदनगर येथून जेरबंद करण्यात सिंहगड पोलिसांना यश आले आहे. तर मुंबई, लातूर या ठिकाणी देखील काही महिलांची आरोपीने फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रशांत भाऊराव पाटील (वय 31) बेळगाव असे आरोपी तरुणाचे नाव असल्याचं समजतं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मॅट्रिमोनी साईटवर एका तरुणीची एका तरुणाशी ओळख झाली. तेव्हा त्याने मी सैन्यात असून तिला वर्दीतील फोटो देखील दाखविले. पुढे त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपी प्रशांत हा पीडित तरुणीला भेटण्यासाठी पुण्यात सैन्याच्या वर्दीत आला.’
‘तिला भेटला, थोडा वेळ गप्पा झाल्यावर,आरोपी प्रशांत तिला म्हणाला की, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया, दर्शन घेतल्यानंतर ड्रेस बदलून घेतो. त्यावर तिला तो नवले ब्रिज येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.’
‘त्यानंतर मला आता ड्युटीवर जायचे, असल्याचे त्याने तिला सांगितले. त्याच्या चारचाकी वाहनातून तिला शनिवारवाडा येथे सोडले. त्यानंतर पीडित तरुणीने अनेक वेळा प्रशांत याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने काही प्रतिसाद दिला नाही.’
‘अखेर त्या तरुणीने आमच्याकडे तक्रार देताच आरोपी प्रशांत याला नगर येथून अटक करण्यात आलं. या प्रकरणानंतर मुंबई आणि लातूर येथून देखील काही प्रकरणसमोर आले आहेत.’ अशी माहिती सिंहगड पोलिसांनी सांगितले.
पुणे हादरलं! २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; चार नराधमांना अटक
38 वर्षीय महिलेवर 24 वर्षीय तरुणाकडून बलात्कार, पुण्याहून परळीला आणून महिलेवर अत्याचार
राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता बीड जिल्ह्यातील परळीत देखील एका 38 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी परळी येथील रहिवासी गणेश बाबुअप्पा कोडी (वय 24 वर्ष) राहणार जंगम गल्ली, गणेशपार,परळी वैजनाथ याने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या 38 वर्षीय महिलेला पुण्याहून परळीला आणले.
परळी येथे तुला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून तो तिला परळीला घेऊन आला. असे या महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. परळीत आल्यानंतर रूम बघून देतो असे म्हणून दिनांक 19 नोव्हेंबर रोजी रात्री आणि 20 नोव्हेंबर रोजी दुपारी बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केल्याची घटना आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT