पुणे जिल्ह्यातील पाटस येथील टोल नाक्याजवळ एसटी बस थांबून आम्ही पोलीस आहोत, ज्यांच्याकडे पास आहेत अशा व्यक्तीची तपासणी करायची आहे..असे सांगून चौघांकडून १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रूपयांची रक्कम आणि सोने लुटण्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेला काही तास होत नाही. तोवर गुन्हे शाखेने तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे.
ADVERTISEMENT
रामदास भाऊसाहेब भोसले, तुषार बबन तांबे आणि भरत शहाजी बांगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.
ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास लातूर ते मुंबई या एस.टी. बसमधून कुरिअर कंपनीतील चौघे जण मुंबईच्या दिशेने १ कोटींपेक्षा जास्त रक्कम आणि सोन्याची दागिने घेऊन जात होते. त्याच दरम्यान एसटी यवत टोल नाक्या जवळ आल्यावर एक चार चाकी गाडी बसच्या मार्गात आडवी टाकण्यात आली. त्या वाहनातील तिघे जण बसमध्ये आले आणि आम्ही पोलिस आहोत. पासधारक कोण आहेत. त्यांच्याकडे आम्हाला चौकशी करायची आहे. अशी विचारणा केली. त्यावर बसमधील चौघांना खाली घेऊन गेल्यावर, ९२ लाख ८४ हजार ५४० रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण १ कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल घेऊन पसार झाले.
त्यानंतर फिर्यादीने यांनी घटनेची माहिती देताच, रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही तपास सुरू असताना. आरोपी रामदास भोसले हा खराडी बायपास येथे साथीदारासह पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तात्काळ खराडी बायपास येथे रामदास भाऊसाहेब भोसले, तुषार बबन तांबे, आणि भरत शहाजी बांगर या तिघांना खराडी बायपास येथून ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून ८० टक्के रक्कम मिळाली असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगण्यात आले.
ADVERTISEMENT