Pune: गड, किल्ल्यांसह सर्व पर्यटनस्थळावर कलम 144 लागू; शहरात अलर्ट जारी

मुंबई तक

• 02:21 PM • 13 Jul 2022

पुणे: पुणे जिल्ह्याला (Pune Rain Update) तीन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पुणे जिल्ह्यातील गड, किल्ल्यांसह सर्व पर्यटनस्थळावर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत. पुढील ४८ तास हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला अलर्ट दिला आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले […]

Mumbaitak
follow google news

पुणे: पुणे जिल्ह्याला (Pune Rain Update) तीन दिवस अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पुणे जिल्ह्यातील गड, किल्ल्यांसह सर्व पर्यटनस्थळावर कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत. पुढील ४८ तास हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला अलर्ट दिला आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

हे वाचलं का?

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्व पर्यटन स्थळांवर १४४ कलम लागू करण्याचे आदेश वन विभागाला दिले आहेत. सिंहगड, लोहगड, विसापूर, राजगड, तोरणा किल्ले यासह इतर गडांवर १४४ कलम लागू होणार आहे. या सह इतर पर्यटन स्थळं अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, पानशेत धरण परिसरात १४४ लागू कलम लागू करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ५ तालुके सोडून इतर तालुक्यातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलैपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. पुणे शहरात येलो अलर्ट तर घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. पुणे हवामान विभाग प्रमुख डॉ अनुपम काशापी यांनी याबाबद माहिती दिली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १४ व १५ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशरा दिला असल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना वरील कालावधीत सुट्टी देण्यात आली आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    follow whatsapp