पुणे : भर चौकात पैलवानाची गोळ्या घालून हत्या; थरारक घटना सीटीटीव्हीत कैद

मुंबई तक

• 09:34 AM • 24 Dec 2021

–स्मिता शिंदे, जुन्नर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नागेश सुभाष कराळे (वय 38, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पैलवान म्हणून ते परिसरात परिचित आहेत. गाडीत बसल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. […]

Mumbaitak
follow google news

स्मिता शिंदे, जुन्नर

हे वाचलं का?

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नागेश सुभाष कराळे (वय 38, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पैलवान म्हणून ते परिसरात परिचित आहेत. गाडीत बसल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. काही क्षणांचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (23 डिसेंबर) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ ही घटना घडली. नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात जाऊन बसले होते. त्यानंतर लगेच तिथे एका कारमधून तीन चार जण आले. दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेश्वर यांना काही कळायच्या आत गोळीबार केला. त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची माहिती आहे.

पिंपरी-चिंचवड : हॉटेलमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा पथकाने ४ महिलांची केली सुटका

या घटनेत नागेश्वर कराळे गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, भरती करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी योगेश दौंडकर याच्यासह अज्ञात चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जुन्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

पुणे: विमानाने पुण्यात यायचे अन् चोरी करायचे, श्रीमंत चोरटे कसे सापडले पोलिसांच्या जाळ्यात?

गोळीबारात मृत्यू झालेले नागेश्वर कराळे हे शेलपिंपळगाव येथे कुस्तीची तालीम चालवणारे पैलवान म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या खुनाच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांची चार पथके रवाना झाली असून काही ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे.

    follow whatsapp