काही राज्यांमध्ये R Value अर्थात कोरोना व्हायरसच्या रिप्रॉडक्शनचं प्रमाण हा चिंतेचा विषय ठरतो आहे. त्यामुळे दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळ या तीन राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होते आहे. काही साथरोग तज्ज्ञांनी याबाबतची चिंता व्यक्त केली आहे. R Value म्हणजेच
ADVERTISEMENT
R Value ही व्हायरसच्या प्रसाराचं प्रतीक आहे. एक रूग्ण दुसऱ्या रूग्णाला संक्रमित करतो, दुसरा तिसऱ्याला. एका रूग्णामुळे सरासरी किती रूग्ण कोरोनाग्रस्त होऊ शकतात याचा अंदाज म्हणजे आर व्हॅल्यू. ही आर व्हॅल्यू म्हणजे बर्फासारखा प्रकार आहे मर्यादा ओलांडली तर हा बर्फ फुटू शकतो. याचाच अर्थ सध्या ही आर व्हॅल्यू कमी वाटत असली तरीही मर्यादा ओलांडली गेल्यास संसर्ग वाढू शकतो. आत्ता दिल्ली, महाराष्ट्र आणि केऱळ या तिन्ही राज्यांना याचा धोका आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सध्या देशाच्या आर व्हॅल्यूचा विचार केला तर ती एकपेक्षा कमी आहे. याचाच अर्थ एखादा माणूस कोरोना संक्रमित झाला तर तो फार फार एका माणसाला संक्रमित करू शकतो. देशाच्या दृष्टीने ही बाब समाधानाची आहे. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते आहे. महाराष्ट्र, केरळ आणि दिल्ली या राज्यांनी आर व्हॅल्यूचा उंबरठा ओलांडला आहे असं मिशिगन विद्यापीठाच्या भ्रमर मुखर्जी यांनी म्हटलं आहे. सध्या भ्रमर मुखर्जी आणि त्यांची टीम भारतातील कोरोना परिस्थिती आणि त्यासंदर्भातला आढावा घेत आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासात ही भीती व्यक्त केली आहे.
याआधीही भारतात कोरोनाची दुसरी लाट धडकू शकते असा अंदाज प्राध्यापक भ्रमर मुखर्जी यांनी व्यक्त केला होता आणि तो खरा ठरला. कारण भारतात दुसरी लाट धडकण्याच्या जवळपास एक आठवडा पूर्वी त्यांनी हा इशारा दिला होता. भ्रमर मुखर्जी आणि त्यांच्या टीमने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील R Value ही 21 जून ते 27 जूनच्या आठवड्यात 0.8 वरून 1 वर गेली आहे. दिल्लीत हे प्रमाण 1.3 इतकं आहे तर केरळमध्ये हे प्रमाण 1 च्या पुढे आहे. या तिन्ही राज्यांमध्ये हे प्रमाण गेल्या आठवड्यात 1 पेक्षा कमी होतं. त्यामुळे एकीकडे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच हा महत्त्वाचा स्टडी समोर आला आहे. देशात जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा महाराष्ट्र, दिल्ली आणि आंध्र प्रदेशातली आर व्हॅल्यू 2.5 च्या पुढे गेली होती.
न्यूयॉर्कच्या Trudeau Institute साथरोग संशोधक डॉ. प्रिया लुथ्रा म्हणतात..
R Value म्हणजे हा अंदाज की एक व्यक्ती साधारण किती लोकांना संक्रमित करू शकते. सरासरीनुसार हा अंदाज काढण्यात येतो. आर व्हॅल्यू वाढली आहे याचा अर्थ हा होतो की संसर्ग वाढला आहे. सध्याचा चर्चेत असलेला साथरोग कोरोना आहे. त्याच्या संसर्गाची पूर्ण माहिती मिळण्यासाठी नवं ट्रान्सफेक्शन, मृत्यू, रूग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या रूग्णांचं प्रमाण या सगळ्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात किती लोकांना या आजाराने ग्रासलं आहे हेदेखील पाहावं लागतं असंही प्रिया लुथ्रा यांनी इंडिया टुडेला सांगितलं.
ADVERTISEMENT