सोशल मीडियावर फोटोही फिरताहेत आणि चर्चाही रंगलीये, ती कशाची तर परिणीती-राघव यांच्या केमिस्ट्रीची. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. परिणीती आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा हे दोघंही एका हॉटेलमधून एकत्र बाहेर पडताना दिसले आणि त्यांची केमिस्ट्री जुळल्याची चर्चा सुरू झाली. पापाराझींनी दोघांनाही एकत्र स्पॉट केले. हे दोघं आधी लंच डेटनिमित्त आणि नंतर डिनर डेटसाठी एकत्र दिसले. यावेळी मीडिया आणि कॅमेरे पाहताच राघव चड्डा हे सरळ गाडीत बसले, पण परिणीतीने पापाराझींना पोझ दिल्या. यानंतर दोघंही एकाच गाडीत बसून गेले.
ADVERTISEMENT
बी-टाऊनला एक नवीन कपल मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्यावेळी परिणीती आणि राघव चड्डा यांना डिनर डेटसाठी एकत्र स्पॉट केलं गेलं, त्यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे आउटफिट परिधान केले होते. त्यांचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली, पण याबद्दल राघव चड्डा आणि परिणीतीने अद्याप कोणतेही भूमिका स्पष्ट केलेली नाही. परिणीती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अजिबात चर्चेत राहत नसते, पण यावेळी घडलंच तसं आहे ज्यामुळे ती ट्रेंडिंगमध्ये आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी गेली, काँग्रेसला झटका; लोकसभा अध्यक्षांची मोठी कारवाई
परिणीतीसोबत रिलेशनमध्ये? राघव चड्डा काय म्हणाले?
खासदार राघव चड्डांना दिल्लीत परिणीतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी विनोदी उत्तर दिले. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही आणि परिणीती रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होत आहे, यावर तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मला राजनितीविषयी (राजकारणाबद्दल) विचारा परिणीतीविषयी नाही”, असं उत्तर देत ते हसले. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
Video:स्कूल बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थ्यांने स्टेअरींग घेतलं हाती…
राघव चड्डा कोण आहेत?
राघव चड्डा हे राजकारणात असून, 34 वर्षीय राघव चड्डा हे 2012 मध्ये आम आदमी पक्षात सामील झाले होते. आप मध्ये त्यांच्यावर आधी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते राष्ट्रीय पक्षाचे कमी वय असलेले प्रवक्ता होते. यानंतर 202 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजिंदर नगरमधून विजय मिळवला. गेल्या वर्षी ते राज्यसभेत निवडून आले आणि देशातील सर्वात कमी वयाचे खासदार बनले.
ADVERTISEMENT