ADVERTISEMENT
काँग्रेस नेते राहुल गांधी सात दिवसांसाठी ब्रिटन दौऱ्यावर आहेत.
यावेळी ते केंब्रिज विद्यापीठात व्याख्यान देणार आहेत. याआधीच राहुल गांधींचा एक फोटो व्हायरल होत आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान लांब केस आणि दाढी असलेल्या लुकनंतर राहुल गांधींचा नवा अवतार समोर आला आहे.
लंडनमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात पोहोचण्यापूर्वीही त्यांनी हा लुक केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये राहुल गांधी बारीक केस आणि ट्रिम केलेल्या दाढी-मिशांमध्ये दिसत आहेत.
राहुल गांधी याठिकाणी कोट-टायमध्ये दिसले. त्यांच्या लुकला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.
ADVERTISEMENT