नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला अडीच वर्षांचा काळ लोटला. मात्र अद्याप या प्रकरणात अद्याप आरोप-प्रत्यारोपांची राळ उठतं आहे. आज (बुधवारी) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गटनेते राहुल शेवाळे यांनी या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणात आरोप केले. रिया चक्रवर्तीला AU म्हणून जे 44 कॉल आले होते ते आदित्य उद्धव ठाकरे यांचेच असल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला.
ADVERTISEMENT
AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे : राहुल शेवाळे
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. परंतु, या तिघांच्या तपासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजेत. ड्रग्जसंबंधात रियाची चौकशी करण्यात आली होती.
सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल AU या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते.
परंतु, मुंबई पोलिसांनी AU म्हणजे रियाची मैत्रिण अनया उदास असल्याचं महटलं होतं. मात्र, AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, अशी माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असं राहुल शेवाळे म्हणाले.
त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं हे मला माहित : आदित्य ठाकरे
राहुल शेवाळे यांच्या या आरोपांना आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. नागपूरमध्ये बोलताना ते म्हणाले, मी एवढचं सांगेन की, Love You More. मुख्यमंत्र्यांवरुन वाचविण्याचा, राज्यपालांना वाचविण्याचा हा प्रयत्न असावा. ज्यांची निष्ठा घरात नसते, त्यांच्याकडून चांगलं अपेक्षित नाही. मला त्या घाणीत जायचं नाही. मी या व्यक्तीला काडीमात्र किंमत देत नाही.
आता त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं हे मला माहित आहे. पण मला यात जायचं नाही. काय काय लोकांच्या खाजगी आयुष्यात मला डोकावायचं नाही. ते माझ्यावर संस्कार नाहीत, मला या घाणीत जायचं नाही. आता वर्ल्डकप बघितला असेल. आपण गोल मारतं राहू. ते सेल्फ गोल मारतायतं. त्यांचे अनेक व्हिडीओज आहेत. पण मी कुठेही यांच्यावर घाणेरेडं बोलणार नाही, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT