मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जुन महिन्यातला प्रस्तावित अयोध्या दौरा आणि त्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून होणारा विरोध हा सध्या कळीचा मुद्दा होऊन बसला आहे. एकीकडे भाजप खासदाराकडून राज ठाकरेंना विरोध होत असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा राज यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून त्याची टिंगलटवाळी केली होती. आता याच राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावर जावं लागत आहे. हे सर्वकाही राजकीय स्वार्थासाठी सुरु आहे. राज यांना अयोध्येला जाण्याचा नैतिक अधिकार नाही. रामलल्ला राज यांना प्रसन्न होणार नाहीत”, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंग यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजप नेते करत आहेत. यावरुनच राज ठाकरे असोत किंवा मग राणा दाम्पत्य यांचा बोलविता धनी भाजपच असल्याचं सिद्ध होतं असाही टोला राऊत यांनी लगावला.
प्रदीप घरत सरकारी वकील कमी आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून जास्त काम करतात; भाजपची टीका
ADVERTISEMENT