Raj Thackeray : राज ठाकरेंनी वाढवली भाजपची 'कटकट'! स्वबळावर लढणार 'एवढ्या' जागा

ऋत्विक भालेकर

• 02:14 PM • 13 Jun 2024

Raj Thackeray Vidhan Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच महाराष्ट्रात विधानसभेची लगबग सुरू झाली आहे. राज ठाकरेंनीही बैठक घेत पदाधिकाऱ्यांना स्वबळाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. 

राज ठाकरेंनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

point

मनसे स्वतंत्रपणे लढणार विधानसभा निवडणूक

point

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांनी महायुतीसोबत न जाण्याच्या भूमिकेत असून, त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना स्वबळाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा लढवायच्या याचा आकडाही राज ठाकरेंनी सांगितला. (Raj Thackeray's MNS will Contest Maharashtra Vidhan Sabha Elections 2024) 
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे दिसत असून, राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुंबईत गुरुवारी (१३ जून) रंगशारदा सभागृहात ही बैठक पार पडली. 

हे वाचलं का?

राज ठाकरेंनी जाहीर केल्या जागा

भाजपकडे राज ठाकरे यांनी 20 जागा मागितल्या असल्याचे माहिती समोर आली होती. त्याचे राज ठाकरेंनी बैठकीत खंडन केले. "मागायच्या तर २० का मागू? 225 जागांवर आपले उमेदवार लढवू", असे म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले.

हेही वाचा >> महायुतीत 'बिघाडी'! उद्धव ठाकरे-काँग्रेसने घेतले जुळवून 

"जनता मनसेची वाट बघत आहे. 200 ते 225 जागांवर आपण तयारी करतोय. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच काही जागावाटपाचं ठरत नाही. मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही", असे राज ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

लोकसभा निवडणूक निकालाचा संदर्भ देत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. "उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे."

हेही वाचा >> अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुजबळ नाराज?

"उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे. त्यामुळे जनता आता मनसेची वाट पाहत आहे. २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढायची तयारी ठेवा", असेही राज ठाकरे बोलले. 

मनसेमुळे महायुतीची होणार अडचण

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महायुतीच्या अडचणी वाढू शकतात.

हेही वाचा >> शिंदेंचे 17 आमदार 'डेंजर झोन'मध्ये, विधानसभा जिंकणं कठीण? 

राज ठाकरेंच्या मनसेचा आणि महायुतीचा अजेंडा जवळपास एकच आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारांमध्ये फूट पडून त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरेंना स्वतंत्र लढण्यापासून थांबवणे आणि महायुतीमध्ये घेऊन जागा देणे, हाच पर्याय सध्या भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससमोर दिसत आहे.

    follow whatsapp