नागपूर: छत्तीसगड सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याता नागपूरमधील पूजा लॉजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश श्रीवास्तव असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड सरकारमध्ये उच्च पदावर कार्यरत होते.
ADVERTISEMENT
राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड शासनात कोषागार विभागाचे सहसचिव (joint director) पदावर कार्यरत होते. काल (3 फेब्रुवारी) संध्याकाळी ते बराच वेळ रूमचा दार उघडत नसल्यामुळे लॉजच्या वेटरला शंका आली. त्यामुळे त्याने संध्याकाळी साडे सातच्या सुमारास लॉज मॅनेजरने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केले असता राजेश श्रीवास्तव मृतावस्थेत त्यांना आढळून आले. यावेळी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अधिक वाचा: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री
दरम्यान, राजेश श्रीवास्तव हे 1 मार्चपासून बेपत्ता होते तेव्हापासून छत्तीसगड पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, काल त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी तपास देखील सुरु केला आहे. राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्याच केली की हा घातपात आहे यादृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत.
छत्तीसगडमधील एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने महाराष्ट्रात येऊन आपली जीवन यात्रा का संपवली याविषयी देखील आता चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणी वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहे.
ही बातमी पाहिलीत का?: पूर्ण कुटुंबाला संपवून नामांकित डॉक्टरची आत्महत्या, काय घडलं असं?
खासदार डेलकरांनी मुंबईत येऊन केली होती आत्महत्या
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दादरा-नगर हवेलीची खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली होती. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली होती. यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली होती. ज्यामध्ये त्यांनी काही भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केलं असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
एकीकडे पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने शिवसेनेला घेरलेलं असताना दुसरीकडे शिवसेनेने डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन भाजपवर टीका करणं सुरु केलं आहे. याच प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी देखील शिवसेनेकडून वारंवार केली जात आहे. त्यामुळे यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये बरीच जुंपली आहे.
ADVERTISEMENT