साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांना अभिनय क्षेत्रातील मानाचा मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यानुसार रजनीकांत यांचा 51व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, “देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलंय. आज महान नायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करून आम्हाला आनंद झाला आहे. रजनीकांत गेल्या 5 दशकांपासून सिनेमा क्षेत्रात राज्य करत असून आणि लोकांचं मनोरंजन करतायत. यामुळेच यंदा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्याचं निश्चित केलं आहे.”
यावेळी सिलेक्शन ज्युरींनी हा निर्णय घेतला आहे. या ज्युरींमध्ये आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या पाचही जणांनी बैठक घेत रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची शिफारस केली.
ADVERTISEMENT