मुंबई: ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच एखादं वादग्रस्त वक्तव्य करुन कायमच स्वत:ला चर्चेत ठेवत असते. मात्र, मागील काही काळापासून राखी सावंत काहीही न करता देखील चर्चेत आली आहे. कारण पंजाबमध्ये सुरु असलेल्या एकूणच राजकारणात चक्क राखी सावंतच्या नावाची चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
पंजाबमधील आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना थेट पंजाबच्या राजकारणातील ‘राखी सावंत’ असं म्हटलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री राखी सावंत मात्र खूपच संतापली आहे.
राखी सावंत आप नेते राघव चढ्ढा यांच्यावर चिडली
ज्या प्रकारे पंजाबमध्ये नेते एकमेकांवर वार-पलटवार करत आहेत ते पाहता येथील राजकारणात अधिक गढूळ झालं आहे. त्यातच नवज्योत सिद्धू यांना थेट राखी सावंतची उपमा देण्यात आल्याने वाद अधिक वाढला आहे. त्याबद्दल आता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
कोणतेही कारण नसताना आपलं नाव ओढलं गेल्याने ड्रामा क्वीन राखी सावंतने ही मात्र, चांगलीच संतापली आहे. ज्याबाबत तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राखी सावंत अत्यंत चिडलेल्या स्वरात म्हणाली, ‘माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा. तुम्ही जे कोणी मिस्टर चड्ढा आहात त्यांनी आता जर माझं नाव घेतलं तर मी तुमची XX काढून टाकेल.’ असं यावेळी राखी म्हणाली.
राखीला मिळाली पती रितेशची साथ?
दुसरीकडे, राखी सावंतने इन्स्टावरील पोस्टमध्ये तिच्या नावाने होत असलेल्या राजकारणाचा उल्लेख केला आहे. राखी सावंतने ट्विटर पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश नावाच्या व्यक्तीने ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या व्यक्तीने राघव चड्ढा, पंजाब पोलीस, काँग्रेस, आम आदमी पार्टी, भाजप यांना टॅग केले आणि लिहिले की, ‘तुमच्या राजकीय फायद्यासाठी कोणाची प्रतिमा खराब करू नका. कृपया आपल्या आमदाराला शिक्षण द्या. जर मी शिक्षण घेतले तर आप कुठेही दिसणार नाही.’
राखीच्या म्हणण्यानुसार ट्वीट करणारा रितेश हा दुसरा-तिसरा कोणी नसून तिचा पती आहे. आता यामध्ये कितपत सत्य आहे हे राखीलाच माहिती, परंतु पोस्टमध्ये, जेव्हा तिच्या पतीने तिच्याबाबत काळजी व्यक्त केली तेव्हा त्याविषयी राखी आनंदी असल्याचं दिसून आली.
यावेळी राखीने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ‘माझ्या पतीने राघव चड्ढाला उत्तर दिले आहे. लोक आतापर्यंत मला एकटे असल्याचे समजून त्रास देत होते. आज माझ्या डोळ्यात अश्रू आहेत हे सांगताना की आज माझ्याकडेही कोणीतरी आहे. जो माझ्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी उभा आहे. धन्यवाद पती.
दरम्यान, राखीने ही पोस्ट केल्यानंतर देवोलीना भट्टाचार्जी हिने त्यावर प्रतिक्रिया देत असं विचारल की, ‘राखी काय झाले? सर्व काही ठीक आहे ना?’
ज्यावर राखी म्हणाली- ‘नाही बेबी, कोणीतरी माझ्या नावाने राजकारण करत आहे.’
एकीकडे पंजाबमधील राजकारण ढवळून निघत असताना दुसरीकडे अभिनेत्री राखी सावंत मात्र चर्चेत आली आहे. आता याबाबत पंजाबमधील काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT