उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असताना रामदास कदम हे बाजूला पडले होते. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर रामदास कदम शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर सातत्यानं तोफ डागताना दिसताहेत. रामदास कदमांनी शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात थेट आदित्य ठाकरेंनाच लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
शिवसेनेत बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ४० आमदार आणि खासदारही फुटले. काही जिल्हाप्रमुखांसह स्थानिक पातळीवरील नेतेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या बाजूने केले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिव संवाद यात्रा सुरू केली असून, शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना गद्दार म्हणून संबोधत आहेत. यावरूनच रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलंय.
रामदास कदम आदित्य ठाकरेंना गद्दार का म्हणाले?
कार्यक्रमात बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘आदित्य ठाकरे गद्दार तू आहेस. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर रामदास कदमला कसं संपावयाचं हा एक कलमी कार्यक्रम मातोश्रीवर सुरू होता. शिवसेनाप्रमुखांचं निधन झाल्यानंतर रामदास कदमला कसं संपवायचं, हा कार्यक्रम सुरू होता. नाईलाजाने मला पर्यावरण मंत्रीपद दिलं. पर्यावरण मंत्री पद नव्हतंच. त्यांना वाटलं, ते खातं घेऊन बाजूला बसेल, त्यांना कुठे माहितीये की रामदास कदम पण आमचा बाप आहे’, असं उत्तर कदमांनी आदित्य ठाकरेंना दिलं.
उद्धवजींना म्हणालो, हे करू नका बाळासाहेबांच्या आत्माला शांती लाभणार नाही -रामदास कदम
‘ते खातं असताना प्लास्टिक बंदीचा कायदा करण्यासाठी मी एक वर्ष अभ्यास केला. अनेक राज्यांत तज्ज्ञ समित्या पाठवल्या. परदेशात समित्या पाठवल्या. त्यावर आणखी एक समिती नेमली. अभ्यास केला आणि त्यानंतर मी आणि सचिवांनी बसून कायदा केला’, असा अनुभव रामदास कदमांनी प्लास्टिक बंदी कायद्याबद्दलचा सांगितला.
‘या कायद्याविरोधात अंबानींनी न्यायालयात ३२ वकील उभे केले होते. रामदास कदमांचा एक वकील होता, तरीही ते या कायद्याला चॅलेंज देऊ शकले नाही. प्लास्टिक बंदीचा जगातील पहिला कायदा रामदास कदमने केला’, असंही ते म्हणाले.
भरत गोगावलेंनी थेट उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य; ‘तेव्हाच शिवसेना भवनात बसले असते, तर…’
प्लास्टिक बंदी कायद्याचं श्रेय आदित्य ठाकरेंनी घेतलं?
‘जसा प्लास्टिक बंदीचा कायदा केला, तसा आदित्य टून टून टून करत मी केला… मी केला. तू काय केला? तू अजून लग्न केलं नाहीस, तू काय करणार आहेस? मग दोन वर्ष माझ्यासोबत. माझ्या कॅबिनमध्ये. शासकीय बैठकांमध्ये. सगळं समजून घेतलं. मग एक दिवस असा आला. मंत्रिमंडळ झालं. बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेटमंत्री आणि मला काका… काका म्हणायचा. काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. काकाच्या जागेवर आदित्य ठाकरे बसला. याला म्हणतात गद्दारी. खरा गद्दार तू आहेस. एखाद्याला नेत्याला संपून टाकायचं. बाप मुख्यमंत्री झाल्यावर तुला कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं’, अशी टीका रामदास कदमांनी केली.
ADVERTISEMENT