रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात नोंदवला जबाब

मुंबई तक

• 01:48 PM • 28 Nov 2022

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी आज शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपला जबाब नोंदवला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी त्यांचा जबाबत नोंदवला. या सगळ्यानंतर रणजीत सावरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पोलीस […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी आज शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपला जबाब नोंदवला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी त्यांचा जबाबत नोंदवला. या सगळ्यानंतर रणजीत सावरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पोलीस लवकरच राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल करतील असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे रणजीत सावरकर यांनी?

मी इथे राहतो त्यामुळे मी इथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कलम काय लावलं ते मला सांगता येणार नाही. मात्र महापुरूषांचं चरित्र हनन आणि बदमानी या मुद्द्यांवर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बदनामी केल्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नावं दिली आहेत असं रणजीत सावरकर यांनी माध्यमांना सांगितलं.

आणखी काय म्हणाले रणजीत सावरकर?

काही दिवसांपूर्वी जे झालं होतं त्याबद्दल भोईवाडा पोलीस ठाण्यात राहुल गांधींच्या विरोधात केस प्रलंबित आहे. कोर्टाने पोलिसांना तपासाचा आदेश दिला आहे. दिल्ली पोलिसांकडे तो आदेश गेला आहे असंही रणजीत सावरकर यांनी सांगितलं.

कायदेशीर प्रक्रिया पार पाडावीच लागेल. लवकरच गुन्हा दाखल होईल. पोलिसांनी आज माझा जबाब नोंदवून घेतलाय. तसेच कुणाबद्दलच आक्षेपार्ह आणि खोटे आरोप करु नये असं माझं स्पष्ट मत आहे असंही रणजीत सावरकर यांनी स्पष्ट केलं. मी 17 नोव्हेंबरला तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आज मला बोलावलं. त्यांनी माझा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आपण पुढची कारवाई करु इशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

राहुल गांधी यांनी हिंगोलीतल्या सभेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला. एवढंच नाही तर वीर सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली असा दावा केला. तसंच गुरूवारी त्यांनी एकत्र पत्रही दाखवलं त्यामध्ये त्यांनी वीर सावरकर यांनी नेमका काय उल्लेख केला होता ते वाचून दाखवलं. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगलं होतं.

    follow whatsapp