गेल्या ४ दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. ९ तारखेला मुंबईत मान्सूनचं अधिकृतरित्या आगमन झालं. परंतू जुन महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांमध्ये शहरात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या ११ दिवसांत शहरांमध्ये ५६५.२ मिमी इतका पाऊस पडला आहे.
ADVERTISEMENT
Monsoon in Mumbai : रविवार-सोमवार शहरात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज
एरवी मुंबईत एका महिन्यात इतका पाऊस पडतो. परंतू यंदा पहिल्या आठवड्यातच पावसाने मुंबईत दाणादाण उडवली आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढचे दोन दिवस मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणकिनारपट्टीला IMD ने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. याव्यतिरीक्त राज्यातील इतर भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
Vasai-Virar मध्ये पावसाची जोरदार बॅटींग, नवी मुंबईत झाड गाडीवर कोसळून नुकसान
सांताक्रूझ वेधशाळेच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत शहरात १०७ मिमी पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्याचा पाऊस पडतो आहे. दरम्यान कुलाबा वेधशाळेत गेल्या २४ तासांत २३.४ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान IMD ने दिलेला अलर्ट पाहता BMC ने सर्व तयारी केली असून सुमद्रकिनारी राहणारे लोकं, मिठी नदीच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु झालं आहे. याचसोबत महापालिका प्रशासनाने सर्व आपात्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
Water Logging in Mumbai : नाल्यात कचरा टाकाल तर २०० रुपये दंड – BMC चा निर्णय
ADVERTISEMENT